आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : 'तुम्हारी पाखी'चे 200 एपिसोड्स पूर्ण, टीमने केले सेलिब्रेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(केक कापताना शोची लीड अॅक्ट्रेस श्रद्धा आर्य आणि अन्य स्टारकास्ट)
लाइफ ओके वाहिनीवरील 'तुम्हारी पाखी' या मालिकेने अलीकडेच 200 भागांचा यशस्वी टप्पा
ओलांडला. यानिमित्ताने मालिकेतील सर्व कलाकारांनी केक कापून यशाचा आनंद साजरा केला.
17 ऑगस्ट रोजी या मालिकेतील लीड अॅक्ट्रेस श्रद्धा आर्यचा वाढदिवस होता. याचदिवशी मालिकेचे 200 भाग पूर्ण झाले. त्यामुळे श्रद्धासाठी हा दुहेरी आनंदाचा क्षण होता.
यावेळी श्रद्धाने तिचा को-स्टार इकबाल खानला मिस केले. इकबाल या शोच्या सुरुवातीपासून मालिकेत होता. मात्र आता तो पुढील भागांमध्ये दिसणार नाहीये. त्याच्याशिवाय मालिका अपूर्ण वाटते, असे श्रद्धा म्हणाली.
इकबालने ही मालिका सोडल्यानंतर त्याच्या जागी आता अभिनेत्री वरुण वडोलाची वर्णी लागली आहे. याविषयी वरुण म्हणतो, "मला या शोमध्ये सहभागी होऊन 20 दिवसच झाले आहेत. या शोचा भाग असल्याचा आणि 200 एपिसोड पूर्ण केल्याचा आनंद आहे." या सेलिब्रेशनमध्ये वरुणची पत्नी आणि टीव्ही अभिनेत्री राजेश्वरी सचदेवा सहभागी झाली होती.
पुढे पाहा, मालिकेच्या सेटवरील सेलिब्रेशनची खास छायाचित्रे...