आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ruslaan Mumtaz To Enter Balika Vadhu; Check Out His Never Seen Pictures Captured At His Home!

'बालिका वधू'मध्ये एन्ट्री करणारा हा अॅक्टर राहतो या लॅव्हिश घरात, बघताच क्षणी खिळतील नजरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'कहता तै दिल जी ले जरा' या मालिकेत सगीता घोषसोबत झळकलेला अभिनेता रुस्लान मुमताज आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका 'बालिका वधू'मध्ये रुस्लानची एन्ट्री झाली आहे. या मालिकेने आता लीप घेतला आहे. या मालिकेत आता लव्ह ट्रँगल बघायला मिळणारेय. माही विज, अविनाश सचदेव आणि रुस्लान यांच्यावर हा लव्ह ट्रँगल चित्रीत करण्यात येणार आहे.
divyamarathi.com ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत रुस्लान म्हणाला, "जी ले जरासाठी शूटिंग करण्याचा अनुभव अविस्मरणीय राहिला. दुर्दैवाने ही मालिका फार काळ चालली नाही. मात्र मी प्रत्येक क्षण एन्जॉय केला. टीव्ही हे प्रेक्षकांसोबत संपर्कात राहण्याचे एक मोठे माध्यम आहे. मी काही सिनेमेसुद्धा केले आहेत, मात्र टीव्ही ऑडीअन्सकडून मिळालेला रिस्पॉन्स खूप मोठा आहे. जी ले जरा... ही मालिका संपल्यानंतर मी चांगल्या स्क्रिप्टच्या प्रतिक्षेत होते. याच काळात बालिका वधू या मालिकेची ऑफर मिळाली. या मालिकेला नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका गाजत आहे. त्यामुळे आता माझ्या भूमिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, याकडे माझे लक्ष लागले आहे."
या मुलाखतीच्या वेळी रुस्लानच्या घराची झलक आम्हाला आमच्या कॅमे-यात कैद करण्याची संधी मिळाली. त्याच्या मुंबईची घराची झलक ही डोळे दिपवणारी आहे. पुढील स्लाईड्समध्ये रुस्लानच्या लॅव्हिश अपार्टमेंटची इनसाइड झलक... सोबतच वाचा, - बालिका वधूमधील भूमिकेविषयी...
- माही विजसोबतची कशी होती केमिस्ट्री आणि बरंच काही...