आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यावर लग्नाच्या बेडीत अडकतंय हे रिअल लाईफ कपल, बघा लग्नाचे Behind The Scenes

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहसिन खान आणि शिवांगी जोशी - Divya Marathi
मोहसिन खान आणि शिवांगी जोशी
मुंबईः छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत कार्तिक (मोहसिन खान) आणि नायरा (शिवांगी जोशी) यांच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे. राजस्थानमधील बीकानेर येथे दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडणार असून त्याच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या स्पेशल वेडिंग सीक्वेन्सचे शूटिंग 15 ते 20 दिवस येथे चालणार आहे. अलीकडेच या शूटिंग सेटवरील काही फोटोज समोर आले आहेत, यामध्ये मोहसिन आणि शिवांगी एकत्र अतिशय सुंदर दिसत आहेत. 

खासगी आयुष्यात रिलेशनशिपमध्ये आहेत मोहसिन-शिवांगी...
मालिकेत मोहसिन खान आणि शिवांगी जोशी यांचे लग्न होत आहे. विशेष म्हणजे मालिकेत प्रियकर-प्रेयसीची भूमिका साकारताना खासगी आयुष्यातसुद्धा दोघांचे सूत जुळले असून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. 

मालिकेत करणार रोमँटिक डान्स... 
सूत्रांच्या माहितीनुसार, मालिकेत वेडिंग सेलिब्रेशनची सुरुवात कार्तिक (मोहसिन खान) आणि नायरा (शिवांगी जोशी) यांच्या रोमँटिक डान्सने होणारेय. हे दोघेही शाहरुख खानच्या 'रईस' या सिनेमातील जालिमा गाण्यावर थिरकणार आहेत. यासाठी दोघांनीही शाहरुख आणि माहिरा यांच्यासारखेच कपडे परिधान केले आहे. या गाण्याच्या शूटिंगविषयी मोहसिन सांगतो, "आम्ही शाहरुखच्या जामिला गाण्याला ट्रिब्यूट देत आहोत. मी शाहरुखचा मोठा चाहता आहे आणि आता त्याच्या गाण्यावर परफॉर्म करणे हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे."
 
असा राहिला कलाकारांचा अनुभव... 
मोहसिन सांगतो, "शूटिंगच्या निमित्ताने मला पहिल्यांदा उंटाची स्वारी करण्याची संधी मिळाली. या स्पेशल सीक्वेन्ससाठी आम्ही राजस्थानी टच आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे." तर शिवांगी म्हणाली, "बीकानेर अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथे फिरण्याची माझी इच्छा आहे. मात्र डे-नाइट शूटिंगमुळे आम्हाला फिरण्यासाठी वेळच मिळत नाहीये. पण मी लवकरच यासाठी वेळ काढणारेय. स्पेशल सीक्वेन्सची शूटिंग आम्ही खूप एन्जॉय करतोय."

पुढील स्लाईड्सवर बघा, शूटिंगचे PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...