आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चंद्रमुखी चौटाला'ने पाहिली कपिलची फिल्म, स्क्रिनिंगला पोहोचले अनेक स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कविता कौशिक, रागिनी खन्ना, रश्मी देसाई - Divya Marathi
कविता कौशिक, रागिनी खन्ना, रश्मी देसाई

मुंबईः प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्माचा 'किस किसको प्यार करुं' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग शुक्रवारी मुंबईतील एका थिएटरमध्ये ठेवण्यात आले होते. येथे कपिलला त्याच्या पहिल्या सिनेमासाठी शुभेच्छा द्यायला इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. सब टीव्हीवरील 'एफआयआर' मालिकेतील चंद्रमुखी चौटाला उर्फ अभिनेत्री कविता कौशिकसह अनेक टीव्ही स्टार्स कॅमे-यात क्लिक झाले.
'उतरन' फेम रश्मी देसाई, 'ससुराल गेंदा फुल' फेम रागिनी खन्ना, क्रिस्टल डिसुजा, श्वेता तिवारी, सरगुन मेहता, माही विज, वाहबिज दोराबजी, शक्ती मोहन या प्रसिद्ध टीव्ही अॅक्ट्रेसेससोबत करणवीर सिंह बोहरा, जय भानूशाली, रवी किशन, विशाल सिंह, करण ट्रॅकर, नीरज भारद्वाज या अॅक्टर्सनी कपिलचा सिनेमा बघण्याचा आनंद लुटला.
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'ची संपूर्ण टीमसुद्धा यावेळी उपस्थित होती. शोमधील सुनील ग्रोवर (गुत्थी), अली असगर (डॉली दादी), उपासना सिंह (पिंकी बुआ), किकू शारदा (पलक) आणि रोशनी चोप्रा यावेळी आवर्जुन हजर होते.
अब्बास-मस्तान दिग्दर्शित 'किस किस को प्यार करुं' या सिनेमात कपिल शर्मासोबत एली अवराम, मंजरी फडनीस, वरुण शर्मा, अरबाज खान, सई लोकूर महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. 25
सप्टेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल झाला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...