आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही इंडस्ट्रीतील या स्टार्सच्या कमाईचा आकडा आहे लाखोंच्या घरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थिएटरपासून ते टेलिव्हिजनवर काम करणा-या जास्तीत जास्त सेलिब्रिटींची बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची इच्छा असते. रुपेरी पडद्यावर झळकल्यानंतर प्रसिद्धीबरोबरच भरपूर पैसा कमावण्याची संधी सेलिब्रिटींना मिळत असते. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की, टीव्हीवरील हिंदी स्टार्सची कमाई फिल्म स्टार्सपेक्षा कुठेच कमी नाहीये. रंजक गोष्ट म्हणजे, हे टीव्ही स्टार्स कधीकधी फिल्म स्टार्सपेक्षा जास्त कमाई करतात.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टीव्ही स्टार्सना डेली बेसिसवर मानधन दिले जाते. स्वतःची इंडस्ट्रीतली 'किंमत' ओळखून टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्सनी आपल्या मानधनात चांगलीच वाढ केलीय.
आजवर केवळ बॉलिवूड कलाकारांच्या मानधनाच्या भव्यदिव्य आकड्यांची चर्चा व्हायची. आता टीव्ही कलाकारही मागे नाहीयेत. त्यांनीही आपलं मानधन वाढवलं आहे.
मुंबईतील एका वृत्तपत्राच्या मते, रोनित रॉय आणि राम कपूर टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत. हे दोघेही टीव्ही इंडस्ट्रीतील आघाडीचे अभिनेते आहेत आणि यांचे प्रत्येक दिवसाचे मानधन आहे तब्बल सव्वा लाख रुपये.
तर करण सिंह ग्रोवरचे प्रतिदिन मानधन ऐंशी हजार रुपये असून अंकिता लोखंडेचे एका दिवसाचे मानधन सत्तर हजार रुपये आहे.
आता यावरुन तुम्ही अंदाज बांधू शकाल, की टीव्ही स्टार्ससुद्धा फिल्म स्टार्स इतकीच किंबहूना कधीकधी त्यांच्यापेक्षा जास्त कमाई करतात.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला कोणता टीव्ही स्टार किती रुपये मानधन घेतो हे सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या टीव्ही स्टार्सची इनकम...