आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेटर्सचा निशाण्यावर ही चाइल्ड आर्टिस्ट, PHOTO वर आले CHEAP कमेंट्स, वाचा काय आहे कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड असो किंवा टीव्ही कलाकार सर्वजण सोशल मीडियावर आपल्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याबाबत काहीनाकाही पोस्ट करतच असतात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले जातात. पण एका अभिनेत्रीला तिने शेअर केलेली पोस्ट बरीच महागात पडली. आपल्या फोटोसह राहत्या घराचा पत्ता पोस्ट करत या अभिनेत्रीने चक्क चाहत्यांना भेटवस्तू आणि शुभेच्छापत्रे या पत्त्यावर पाठवा असे सांगितले.

'महाराणा प्रताप' मालिकेत महाराणी अजबदेची भूमिका साकारणारी अभिनेत्री रोशनी वालियाने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. त्यात तिने तिच्या वाढदिवसाबाबतही सांगितले. लवकरच रोशनीचा वाढदिवस आहे. तसेच, फोटोसह स्वतःचा राहत्या घराचा पत्ता पोस्ट करून याच पत्त्यावर भेटवस्तू आणि शुभेच्छापत्रे पाठवा असेही तिने लिहले.
पण नेटिझन्सना हे काही पटले नाही. रोशनी स्वतःच भेटवस्तूंची मागणी करतेय हे त्यांना न आवडल्याने नेटिझन्सनी त्यावर टीका करण्यास सुरुवात केली. काहींनी तर तिच्या फोटोवरही वाईट प्रतिक्रिया दिल्या. तर काहींनी या १५ वर्षीय अभिनेत्रीला पाठिंबा दिला. आपल्या वाढदिवसासाठी उत्सुक असलेल्या रोशनीने एका फॅशन ब्रॅण्डच्या शूटवेळचा फोटो पोस्ट केला आहे. पण आपल्या पोस्टवर नेटिझन्सच्या टीकेचा भडीमार होईल याविषयी तिला कल्पना नव्हती.

रोशनीने २०१५ साली झी टीव्हीच्या 'वादा राहा' मालिकेत काम केले होते. तिने आपल्या करियरची सुरुवात २०१२ साली 'मैं लक्ष्मी तेरे आंगन' की या मालिकेले केली होती. यात तिने जियानाची भूमिका साकारली होती. याव्यतिरीक्त तिने लाइफ ओकेच्या 'रिंगा रिंगा रोजेज' मध्येही काम केले होते. सोनी वाहिनीवरील 'महाराणा प्रताप' मालिकेत रोशनी मुख्य भूमिकेत होती. त्यात तिने महाराणी अजबदेची भूमिका साकारली होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, रोशनची मेसेज आणि त्यावर युजर्सने दिलेल्या प्रतिक्रिया..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...