आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिलविषयी बदलला KRKचा सूर, मात्र निशाणा साधण्याचा धडाका सुरुच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: कमाल रशिद खान आणि कपिल शर्मा, सोबतच, केआरकेचे टि्वट
मुंबई: विनोदवीर कपिल शर्मा आणि अभिनेता-निर्माता कमाल रशिद खान अर्थातच केआरके यांच्यामधील टि्वटर युध्दाला नवीन वळण आले आहे. कालपर्यंत कपिलच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचा दावा करणारा कमाल मावळकिने वागत असल्याचे दिसून येत आहे. मात्र कधी-कधी तो आपल्या मुळ स्वभावाने कपिलवर टिकाही करत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण: वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
गुरूवारी (3 जुलै) संध्याकाळी त्याने आपल्या टि्वटर अकाउंटवर लिहिले, की कुणीतरी त्याच्या आणि कपिल शर्मामध्ये गैरसमज निर्माण करत आहे. त्यामुळे कपिल नाराज आहे. त्याला तो एका विनोदवीराच्या रुपात आवडतो. यादरम्यान कमालने त्याला जोकर म्हणून त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता. त्याने टि्वटरवर लिहिले, 'जोकर सिनेमात नाही सर्कसमध्येच चांगले दिसतात. म्हणून त्याने कॉमेडी सर्कसमध्येच काम करावे. तो मला हसवतो म्हणून मला तो आवडतो.'
केआरकेने कपिलवर लावला होता धमकीचे फोन कॉल्स करत असल्याचा आरोप
अलीकडेच बातमी आलीये, की कपिल शर्माची यशराज फिल्म्सच्या 'बँक चोर'मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशावेळी केआकरेने टि्वट करणे म्हणजे अग्नित तेल ओतण्यासारखेच आहे. त्याच्या टि्वटने असे सिध्द होते, की त्याने पुन्हा एकदा याच कारणाने कपिलवर निशाणा साधला आहे. त्याने टि्वटरवर लिहिले, 'हाहाहाहाहाहा...वायआरएफ आणि कपिलने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आता यशराज बॅनरचा 'बँक चोर' कपिलशिवाय येणार आहे.' मात्र त्याच्या या टि्वटवर कपिलची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.
केआकरे टि्वट्समधून हे स्पष्ट होत नाहीये, की त्याला कपिलकडून अखेर काय अपेक्षित आहे. एकिकडे तो त्याला पसंत असल्याचेही दिसते आणि दुसरीकडे, तो त्याच्यावर टिकादेखील करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून तुम्ही स्वत:च वाचा केआरकेव्दारा कपिलविषयी करण्यात आलेले टि्वट्स...