आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'झांसी की राणी\' आता मोठ्या पडद्यावर दाखवणार अभिनयाची झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकप्रिय टीव्ही शो 'झांसी की राणी'मधून प्रसिध्द झालेली अभिनेत्री उल्का गुप्ता पुन्हा एकदा राजकुमारी बनण्यासाठी तयार आहे. परंतु यावेळी ती छोट्या नव्हे तर मोठ्या पडद्यावर एका राजकुमारीचे जीवनपट दाखवताना दिसणार आहे. तेलगू सिनेमा दिग्दर्शकाने राणी रुद्रमादेवीच्या जीवनपटावर सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी राणीच्या बालपणीच्या भूमिकेसाठी उल्काला निवडले आहे.
या सिनेमाचे नाव 'रुद्रमादेवी' असून त्यामध्ये राणीचे बालपणीचे रुप उल्का तर मोठ्यापणीचे रुप तेलगू सिनेमांची प्रसिध्द अभिनेत्री अनुष्का शेट्टी साकारणार आहे. उल्का 'झांसी की राणी' या मालिकेशिवाय 'जिंदगी खेलती है आखमिचोली'मध्येसुध्दा दिसली आहे.
दिव्य मराठी डॉट कॉमसोबत बातचीत करताना उल्काने सांगितेल, की सिनेमाची कहाणी 13व्या दशकातील म्हणजे काकतीय राजवंश रुद्रमादेवी राजकुमारी आणि राजकुमार रुद्रदेवी यांच्या काळातील आहे.
ती म्हणते, 'या सिनेमाच्या 25 टक्के भागात माझा सामावेश आहे. मी राजकुमारीच्या बालपणीची भूमिका साकारणार आहे. माझे आवडते फिल्मस्टार राणा दग्गुबतीसुध्दा या सिनेमात आहे हे ऐकून मी खूप उत्साही झाले. सिनेमाची कहाणी माझ्या आणि सुपरस्टार श्रीकांत मेका यांचा मुलगा रोशन मेकाच्या पात्रावर आधारित आहे. पुन्हा एकदा मला ऐतिहासिक भूमिका मिळाल्याने मी खूप उत्साही आणि आनंदी आहे. आशा करते, की प्रेक्षक मला मोठ्या पडद्यावर पसंत करतील.'
आता सिनेमा रिलीज झाल्यानंतर माहित होईल प्रेक्षक उल्काला किती पसंत करतील आणि किती नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा उल्का गुप्ताची काही खास छायाचित्रे...