Home »TV Guide» Unknown Facts About Bhabi Ji Ghar Par Hai Fame Happu Singh Aka Yogesh Tripathi

दोन वर्षे ऑडिशन देत भटकत होता 'भाभीजी घर..' मधील 'हॅपू सिंग', एका जाहिरातीने बदलले नशीब !

दिव्य मराठी वेब टीम | Jul 15, 2017, 10:19 AM IST

'भाभीजी घर पर है' या मालिकेत हॅपू सिंगची भूमिका करणारा अभिनेता योगेश त्रिपाठीला या रोलमुळे ओळख मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षात केलेला स्ट्रगल आता कुठे कामी येत असल्याचे त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले. केवळ ओळखच नाही तर या रोलने योगेशला आर्थिकदृष्ट्याही सक्षम बनवले. हॅपू सिंगचा रोल मिळण्याअगोदर योगेशने अनेक वर्षे प्रोडक्शन हाऊसबाहेर 12-12- तास उभे राहून काढले आहेत असे त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीने सांगितले.
क्लोरमिंटच्या जाहिरातीने केले हिट..
जवळपास दोन वर्षे स्ट्रगल केल्यानंतर योगेशला 2007 साली क्लोरमिंटची जाहिरात भेटली ज्यात त्याने कबड्डी प्लेअरची भूमिका केली होती. ही जाहिरात फार लोकप्रिय झाली आणि त्यानंतर योगेशने जवळपास 67 जाहिरातीत काम केले.
12-12 तास उभा राहायचा रांगेत..
आमच्या प्रतिनीधीशी बोलताना योगेशने सांगितले की, लखनऊमध्ये चार वर्षे थिएटर केल्यानंतर मी मुंबईत 2005 साली आलो. कोणीही गॉडफादर नसताना उराशी केवळ एक स्वप्न घेऊन मुंबईत दाखल झालो. पण एक गोष्ट होती की माझ्यात आत्मविश्वास होता. दोन वर्षे स्ट्रगल केल्यानंतर मला टीव्हीवर छोटीमोठी भूमिका मिळत असे. हे दोन वर्षे मी केवळ ऑडिशन दिल्या. मी रोज सकाळी 10 वाजता ऑडिशन देण्यासाठी पोहचत असे त्यानंतर 12-12 तास मी रांगेत उभी राहत असे. पण तरीही मला यश मिळत नव्हते. असे दोन वर्षे चालले.
पुढच्या स्लाईडवर वाचा, योगेश त्रिपाठीबद्दल अजून काही खास गोष्टी..

Next Article

Recommended