आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तारक मेहता...'मधील मि. अय्यर आहे मराठमोळा तरुण, को-स्टारसोबतच्या वादामुळे आला चर्चेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तनुज महाशब्दे आणि मुनमुन दत्ता - Divya Marathi
तनुज महाशब्दे आणि मुनमुन दत्ता
काही मालिका टीव्हीवर वर्षानुर्वष चालतात. या वर्षानुर्वष चालत असल्या तरी त्यांचं कथानक कधीच रटाळ वाटत नाही. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यात असते, वर्षानुर्वष चालत असलेल्या मालिकांच्या यादीमध्ये टॉपवर असलेली मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. ही मालिका तर हिट आहेच, पण या मालिकेने त्यात काम करणा-या प्रत्येक कलाकाराला इंडस्ट्रीत स्वत:ची अशी वेगळी ओळख दिली. या मालिकेतले एक मराठमोळे नाव म्हणजे तनुज महाशब्दे.
'तारक मेहता...' या मालिकेमधला अत्यंत हुशार, व्यवसायाने शास्त्रज्ञ असलेला दक्षिण भारतीय कृष्णन अय्यर म्हणजे तनुज महाशब्दे, ‘गोकुळधाम सोसायटी’मधली सगळ्यात सुंदर बायको त्याचीच. मात्र याच बायकोशी अर्थातच अभिनेत्री मुनमुन दत्तासोबत ख-या आयुष्यात झालेल्या भांडणामुळे सध्या तनुज चर्चेत आला आहे.
काय आहे प्रकरण...
'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या सेटवर बबिताजी अर्थातच मुनमुन दत्ता आणि अय्यर अर्थातच तनुज महाशब्दे यांच्यात कोल्ड वार चालू आहे. कथितरित्या, मागील दिवसांत दोघांमध्ये जोरदार भांडण झाले यादरम्यान मुनमुनने तनुजला खूप ऐकवल आणि उपस्थित लोक फक्त पाहत राहिले. रिपोर्ट्सनुसार, सेटवर मुनमुन शूटसाठी तयार होती. परंतु तनुज टेबल टेनिस खेळण्यात बिझी होता. जेव्हा मुनमुनला माहित झाले तेव्हा ती भडकली. रागात मुनमुन तनुजकडे गेली आणि सर्वांसमोर तिने राग व्यक्त केला. त्यानंतर मुनमुन आणि तनुज एकमेकांना बोलायला तर सोडाच पण पाहायलासुध्दा टाळत आहेत. मात्र, स्वत: तनुजने असे काही घडलेच नसल्याचे सांगितले आहे. तसेच मुनमुनकडून काहीच उत्तर मिळाले नाहीये.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, मि. अय्यर अर्थातच मराठमोळ्या तनुजविषयी..
बातम्या आणखी आहेत...