Home »TV Guide» Unseen Photos Of Renuka Israni Aka Gandhari Of Tv Show Mahabharat

आता अशी दिसते 80च्या दशकातील 'महाभारता'तील गांधारी, वयाच्या 51 व्या वर्षीही आहे अविवाहित

किरण जैन | Mar 18, 2017, 00:36 AM IST

मुंबईः 80 च्या दशकात आलेल्या बी आर चोप्रांच्या 'महाभारत' या मालिकेतील सर्वच पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या मालिकेत दुर्योधनची आई गांधारीची भूमिका अभिनेत्री रेणुका इसरानी यांनी साकारली होती. दुर्योधनची भूमिका साकारणारे पुनीत इस्सर रेणुका यांच्यापेत्रा वयाने सात वर्षांनी मोठे आहेत. 70-80मालिका आणि 10-15 टेलीफिल्म्स करणा-या रेणुका यांना जास्तीत जास्त लोक आजही गांधारीच्या भूमिकेसाठीच ओळखतात. dainikbhaskar.com सोबत बोलताना रेणुका यांनी त्यांच्या टेलिव्हिजन जर्नीविषयी सांगितले. 51 वर्षीय रेणुका अद्याप अविवाहित आहेत.
वयाच्या 22 व्या वर्षी साकारली होती गांधारीची भूमिका..
रेणुका सांगतात, "जेव्हा मी 'महाभारत' या मालिकेत गांधारीची भूमिका साकारली होती, तेव्हा माझे वय 22 वर्षे होते. ती माझी दुसरी मालिका होती. त्यापूर्वी मी 'हम लोग' ही मालिका केली होती. त्यामुळे उषा रानीची भूमिका मी साकारली होती. गांधारी ही व्यक्तिरेखा माझ्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरली, हे मी आजही मान्य करते. त्याकाळात मला स्वतःला अभिनय क्षेत्रात स्थिरस्थावर करायचे होते. आणि 'महाभारत' या मालिकेने माझे स्वप्न पूर्ण करायला मला मोठी मदत केली होती. आजही 'महाभारत' या मालिकेतील सर्व आठवणी मनात ताज्या आहेत."

अॅस्ट्रोलॉजरने केली होती भविष्यवाणी
रेणुका यांनी पुढे सांगितले, "जेव्हा मी 15 वर्षांची होती, तेव्हा एका अॅस्ट्रोलॉजरने मी क्रिएटिव्ह फिल्डमध्ये नाव कमावणार असल्याची भविष्यवाणी केली होती. बालपणी डॉक्टर व्हायचे माझे स्वप्न होते. पण नशीबात काही वेगळेच लिहून होते. दिल्ली मी एनएसडी (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा)मध्ये प्रवेश मिळवला. त्याचकाळात मला 'हम लोग' ही मालिका मिळाली. त्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही. आजही लोक मला गांधारीच्या भूमिकेसाठी ओळखतात याचा मला आनंदच होतो. छोट्या पडद्यावरचा माझा हा प्रवास खूप सुखदायक राहिला आहे."

गोल्ड मेडलिस्ट आहे रेणुका
रेणुका जयपूरच्या महाराणी कॉलेजमध्ये ऑल राउंडर गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्या सांगतात, जेव्हा मी दिल्लीत थिएटर करत होते, तेव्हा अनेक अवॉर्ड्स मला मिळाले. फार कमी लोकांना ठाऊक आहे, की बी आर चोप्रांच्या 'महाभारत'पूर्वी रंगभूमीवर मी गांधारीची भूमिका साकारली आहे. रेणुका यांनी सांगितले, "मी मणिपुरी स्टाइलमध्ये 'अंधायुग' नावाचे नाटक केले होते. त्यामध्ये मी गांधारीची भूमिका साकारली होती. त्यामुळे गांधारीविषयी मला बरेच ठाऊक होते. माझ्या मते, गांधारी हे 'महाभारत'मधील सर्वात चॅलेंजिंग कॅरेक्टर होते, आणि वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी मला ते साकारण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. "

इमोशनल आहे टीव्ही इंडस्ट्रीपासून ब्रेक घेण्याचे कारण
रेणुका शेवटच्या 'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेत झळकल्या होत्या. त्यानंतर ब-याच काळापासून त्यांचे दर्शन छोट्या पडद्यावर घडलेले नाही. याचे कारण खूप भावनिक असल्याचे त्या सांगतात. त्या म्हणाल्या, "माझे वडील 83 वर्षांचे आहेत. ते आता काही बोलू शकत नाहीत. मीच केवळ त्यांचे इशारे समजू शकते. मी सतत त्यांच्या आजुबाजुला असते. आता माझ्या आईचे वयसुद्धा 80 वर्षे झाले आहे. दोघांना देखभालीची गरज आहे. मी त्यांची जबाबदारी घेतली आहे. प्रामाणिकपणे सांगायचे म्हणजे, मी आता त्यांना समर्पित असून माझ्या या निर्णयामुळे मी आनंदी आहे."

बौद्ध धर्माच्या फॉलोअर असलेल्या रेणुका यांनी लोंखडवाला येथे एका चॅप्टरची जबाबदारी घेतली आहे. त्यांचे काम लोकांना बौद्ध धर्माविषयी मार्गदर्शन करणे हे आहे. रेणुका या लेखिका आणि कवियत्रीसुद्धा आहेत.

पुढील स्लाईड्सवर बघा, रेणुका यांचे अनसीन फोटोज...

Next Article

Recommended