आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्ट्रगलिंग डेजमध्ये असा होता शाहरुख अंदाज, तुम्ही पाहिलेत का हे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने त्याच्या करिअरची सुरुवात 1989 साली छोट्या पडद्यावर प्रसारित झालेल्या 'फौजी' या मालिकेद्वारे केली होती. या मालिकेत शाहरुखने अभिमन्यु राय नावाच्या आर्मी ऑफिसरची भूमिका वठवली होती. या मालिकेचे जास्तीत जास्त शूटिंग हे दिल्लीत झाले होते. SrkUniverse नावाच्या ट्विटर हँडलने शाहरुखच्या 'फौजी' या मालिकेच्या सेटवरील काही Never Seen Before फोटोज शेअर केले आहेत. या फोटोदत सडपातळ आणि अगदी सामान्य तरुणाच्या रुपात शाहरुख दिसतोय. 

टीव्हीनंतर मोठ्या पडद्यावर केली एन्ट्री... 
'फौजी'च्या यशानंतर शाहरुखने अजीज मिर्झांच्या 'सर्कस' (1989-90), मणी कौल यांच्या 'इडियट' (1991 Q) आणि 'वागले की दुनिया' (1988-90) या मालिकांमध्ये काम केले. टीव्ही इंडस्ट्रीत लोकप्रिय झाल्यानंतर शाहरुखने ऋषी कपूर आणि दिव्या भारती स्टारर 'दीवाना' या सिनेमातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. 'दीवाना'साठी त्याला फिल्मफेअर बेस्ट मेल डेब्यू अवॉर्ड मिळाला. होता. त्यानंतर शाहरुखने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि एकामागून एक हिट सिनेमे देत फिल्मी दुनियेचा सुपरस्टार ठरला. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पहिल्यांदाच बघा शाहरुख खानचे Unseen Photos...
बातम्या आणखी आहेत...