आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्या-रोहित बनले जन्मोजन्मीचे सोबती, पाहा त्यांच्या लग्नाचे न पाहिलेले PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः अभिनेत्री ऐश्वर्या सखुजा मैत्रिणीसोबत आणि शेजारच्या छायाचित्रात ती आपल्या भावासोबत दिसत आहे.)

मुबंई- टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल ऐश्वर्या सखूजा 5 डिसेंबर 2014 रोजी बॉयफ्रेंड रोहित नागसोबत लग्नगाठीत अडकली. हा लग्नसोहळा नवीन दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला होता. लग्नाच्या सर्व विधी पारंपरिक पध्दतीने पार पडल्या. पूजा शर्मा, करण वाही, साहबान असीम आणि रोहित बॅनर्जीसारखे टीव्ही स्टार्स आणि ऐश्वर्याचा मित्र परिवार त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी लग्नसोहळ्यात पोहोचले होते.
ऐश्वर्याने आपल्या लग्नात खूप एन्जॉय केले. सर्व विधी अविस्मरणीय राहतील असा प्रत्येक क्षण तिने घालवला. विशेष म्हणजे, मेंदी समारंभादरम्यान ऐश्वर्याने सास-यांसोबत 'लुंगी डान्स' गाण्यावर डान्स केला. हा नजारा त्यावेळी पाहण्यासारखा होता.
'सास बिना ससुराल' आणि 'मै ना भुलूंगी' या ऐश्वर्याच्या गाजलेल्या मालिका आहेत. याशिवाय तिने 2011मध्ये 'यू आर माय जान' सिनेमातसुद्धा काम केले आहे. तसेच, तिचा पती रोहित नाग एक निर्माता आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला ऐश्वर्या आणि रोहित यांच्या लग्नाची नवीन छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा ऐश्वर्या-रोहितचा वेडिंग अल्बम...