आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉली बिंद्राला तिच्या वादग्रस्त इमेजसाठी ओळखले जाते. बिग बॉस सिझन 4 मध्ये डॉली दिसली होती. तिचा भांडखोर स्वभाव, ओरडणे, रडणे, प्रेक्षकांना इतके आवडले, की निर्मात्यांना तिची या शोमध्ये रिएन्ट्री करावी लागली. आता बिग बॉस सिझन 7ला लवकरच सुरुवात होणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉली पुन्हा एकदा या शोमध्ये सहभागी होऊ शकते.
तसे पाहता बिग बॉसच्या गेल्या सहा पर्वात माजी स्पर्धकांना शोमध्ये पुन्हा संधी दिली गेली नव्हती. मात्र डॉलीला या शोच्या सातव्या पर्वात सहभागी करुन घेण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.
डॉलीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे म्हणजे, तिने वयाच्या अठरा वर्षी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. 1996 मध्ये तिने आपला पहिला बॉलिवूड सिनेमा केला. या सिनेमाचे नाव होते खिलाडियों के खिलाडी. या सिनेमात तिने भगवंतीची भूमिका साकारली होती. त्यानंतर डॉली अजय, प्यार कोई खेल नही, जानवर, ग्लॅमर गर्ल, बिच्छू, खिलाडी 420, सेंसर, गदर, यादें, स्टाईलसह ब-याच हिंदी सिनेमांमध्ये झळकली.
डॉलीबद्दल आणखी सांगायचे झाल्यास, तिचे वीणा मलिकबरोबर झाले भांडण बरेच गाजले होते. वीणा मलिकवरचा आपला राग व्यक्त करण्यासाठी ती पाकिस्तानात गेली होती. येथे तिने मीडियासमोर चप्पल हातात घेतली होती.
नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारी डॉली बिग बॉसच्या सातव्या पर्वात सहभागी झाल्यास प्रेक्षकांना तिचे आणखी नवे कारनामे बघता येतील. असो, आता ती या शोचा भाग होणार, की नाही हे येणा-या दिवसांत कळेलच.
आम्ही तुम्हाला डॉली बिंद्राची तुम्ही न बघितलेली छायाचित्रे दाखवत आहोत. याशिवाय बिग बॉसच्या घरातील तिची झलकही बघा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.