आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2nd Wedding Ann. : श्वेता तिवारीने थाटला दुसरा संसार, पहिल्या लग्नापासून आहे एक मुलगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे - पती अभिनवसोबत श्वेता, उजवीकडे - मुलगी पलक, नवरा अभिनवसोबत श्वेता तिवारी)

टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस' विजेती श्वेता तिवारीच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस आहे. 13 जुलै 2013 रोजी श्वेता आणि अभिनव यांनी लग्न करून आपल्या प्रेमाच्या नात्याचे लग्नात रुपांतर केले होते.
करिअरमध्ये यशस्वी ठरलेल्या श्वेताला आपल्या खासगी मात्र अनेक चढउतार बघावे लागले. श्वेताचे पहिले लग्न राजा चौधरीबरोबर झाले होते. मात्र तिच्या वैवाहिक आयुष्यात प्रेमापेक्षा वाद जास्त होते. अनेकवेळा राजा चौधरीने श्‍वेताला मारहाण केली होती. त्‍याच्‍या या स्‍वभावाला कंटाळून श्वेताने पहिल्‍यांदा पोलिसांमध्‍ये तक्रार केली. त्‍यानंतर तिने त्‍याच्‍यापासून घटस्‍फोट घेतला. श्वेताला आपल्या पहिल्या लग्नापासून एक मुलगी असून पलक तिचे नाव आहे. पलकची कस्टडी श्वेताकडेच आहे.
श्वेताने अभिनवबरोबर लग्न करुन आपला दुसरा संसार थाटला. साडेतीन वर्षांच्या मैत्रीनंतर दोघे रेशीमगाठीत अडकले. टेलिव्हिजन शो ‘झलक दिखला जा 6’ मध्ये श्वेताने आपल्या लग्नाची घोषणा केली होती, तर ‘कॅरी’ मालिकेतून अभिनवला प्रसिद्धी मिळाली.
श्वेता आणि अभिनवचे लग्न पारंपरिक पद्धतीने झाले. या दोघांच्या लग्नात टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी आले होते. नववधुच्या रुपात श्वेता कमालीची सुंदर दिसत होती.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला श्वेता तिवारीच्या लग्नाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा श्वेता तिवारीच्या लग्नाचीUNSEEN छायाचित्रे...