आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिलच्या 'बुआ'ने सोडला कृष्णाचा शो, जाणून काय आहे खरे कारण?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उपासना सिंह - Divya Marathi
उपासना सिंह
मुंबई: कपिल शर्माची ऑनस्क्रीन बुआ बनून लोकप्रिय झालेल्या उपासना सिंहने अलीकडेच कृष्णा अभिषेकच्या 'कॉमेडी नाइट्स लाइव्ह' शोला अलविदा म्हटले आहे. एका एंटरटेन्मेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत तिने निर्मात्यांवर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. तिच्या सांगण्यानुसार, 'कृष्णाचा शो सोडण्यामागे तिच्याकडे एक नव्हे अनेक कारणे आहेत. चार महिने काम केल्यानंतर तिला दोन महिन्यांचे पेमेंट दिले आहे. इतकेच नव्हे तर उपासना सिंगने कृष्णाच्या शोला 'Dead' म्हटले.'
उपासनाने काय-काय सांगितले...
- उपासनाच्या सांगण्यानुसार, 'हा शो 'कॉमेडी नाइट्स लाइव्ह' नव्हे 'कॉमेडी नाइट्स डेड' आहे. त्यांनी मला करारातच नव्हे तर योग्य पेमेंट न देऊन धोका दिला आहे. आजपर्यंत मला केवळ दोन महिन्यांचेच पेमेंट मिळाले आहे. मी या शोमध्ये चार महिने काम केले. आम्ही आपसात चार महिन्यांपूर्वी काही क्लॉज बनवले होते. परंतु आता त्यांनी मला नवीन क्लॉज साइन करण्यास सांगितले आहे.'
- उपासना सांगते, 'ते मला म्हणाले, की मी प्रत्येक एपिसोडमध्ये दिसणार आहे. मी शोमध्ये एक महत्वपूर्ण कॅरेक्टर आहे. शिवाय, त्यांनी सांगितले, की प्रत्येक महिन्याला पेमेंट देतील. परंतु असे काहीच झाले नाही.'
क्रिएटीव्ह टीमलासुध्दा धरले धारेवर...
- उपासनाने यादरम्यान शोच्या क्रिएटीव्ही टीमलासुध्दा निशाण्यावर धरले. ती म्हणाली, 'मी तेथील क्रिएटीव्ह टीमने समाधानी नव्हते. मला कधीच वाटले नाही, की मी कॉमेडी करतेय. काहीच लिहिलेले नसायचे. मी दिग्दर्शकालासुध्दा सांगितले. मी म्हणाले, मी जर या लाइन्सवर हसू शकत नसेल तर प्रेक्षक कसे हसतील.'
- उपासनाच्या सांगण्यानुसार, शोमध्ये तिला कर्म्फटेबल वाटत नव्हते. तिने सांगितले, 'निर्मात्यांना वाटत होते, की मी आजही कपिल शर्माच्या टीमचा एक भाग आहे. त्यांना मी अँटी कपिल हवे होते. त्यांनी मला टीममध्ये यासाठी ठेवले, कारण मी कपिलच्या शोची प्रोमिनेंट मेंबर होते.'
- उपासना सांगते, 'आम्ही कपिलच्या शोमध्ये शूट करत होतो, तेव्हा आधी अनेकदा सराव व्हायचा. मीटींच्या माध्यमातून इनपुट्स काढले जात होते. परंतु 'कॉमेडी नाइट्स लाइव्ह'मध्ये तर बस...'
निर्मात्यांनी केली ही मागणी...
- उपासनाने पुढे सांगितले, 'निर्मात्यांनी तिला इतर शो करण्यास नकार दिला होता.'
कपिलच्या शोमध्ये एंट्री करणार उपासना?
- उपासनाला विचारले, की कृष्णाचा शो सोडल्यानंतर ती कपिलच्या टीममध्ये सामील होणार आहे? यावर ती म्हणाली, 'मला त्यांना अॅप्रोच करायचे नाहीये. माझ्याकडे कामाची कमी नाहीये. सध्या मी 'संतोषी माँ' करतेय. 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'पूर्वीसुध्दा माझ्याकडे अनेक कामे होती. मी दिर्घकाळापासून इंडस्ट्रीत आहे आणि काम करतेय. मी कपिलच्या टीमसोबत सोनीवर न जाण्याचा निर्णय घेतला होता. तो अयोग्य ठरला. परंतु 18 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच मला अशा वाईट अनुभवाचा (कॉमेडी नाइट्स लाइव्ह) सामना करावा लागला.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा उपासना सिंहचे काही फोटो...
बातम्या आणखी आहेत...