एन्टरटेन्मेंट डेस्कः 'बिग बॉस 8' या शोमध्ये स्पर्धक म्हणून झळकलेला अभिनेता उपेन पटेलने नुकतीच वयाची 33 वर्षे पूर्ण केली आहेत. 16 ऑगस्ट 1982 रोजी लंडन येथे त्याचा जन्म झाला. रविवारी उपेनने त्याची गर्लफ्रेंड आणि टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्नासोबत हा खास दिवस सेलिब्रेट केला.
सध्या उपेन आणि करिश्मा अमेरिकेत सुटी एन्जॉय करत आहेत. उपेनच्या बर्थडे सेलिब्रेशन आणि अमेरिका टुरची निवडक छायाचित्रे करिश्माने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत. एका छायाचित्रात ती उपेनला किस करताना दिसत आहे. या छायाचित्रासोबत तिने लिहिले, "karishmaktannaHappy bday my lover!!! 😍🍰🍻🎉🎈🎊❤️ according to ist."
शिवाय कँडल लाइट डिनर आणि कँडिड मोमेंट्सची छायाचित्रेसुद्धा करिश्माने आपल्या सोशल नेटवर्किंग अकाउंटवर शेअर केली आहेत. 'बिग बॉस'च्या घरातच उपेन आणि करिश्माचे सूत जुळले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, उपेन-करिश्माची अमेरिका टुरची छायाचित्रे...