आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 दिवस राहिल्यानंतर Bigg Bossच्या घरातून बेघर झाला उपेन पटेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः 'बिग बॉस'च्या घरात उपेन पटेल)
मुंबईः 'बिग बॉस'च्या घरातील हा आठवडा अनेक सरप्राइजेस घेऊन आला. 31 डिसेंबर रोजी घरातील सदस्यांना आपल्या कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळाली, तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी उपेन पटेलवर बिग बॉसच्या घरातून बेघर होण्याची वेळ आली. तब्बल 100 दिवस येथे घालवल्यानंतर उपेन या शोबाहेर पडला.
गुरुवारी अचानक झालेल्या एविक्शनमुळे केवळ उपेनच नव्हे तर घरातील प्रत्येक सदस्य हैराण झाला. विशेष म्हणजे त्याची मैत्रीण करिश्मा उपेनच्या एविक्शनमुळे जास्त दुःखी झाली. एकमेव उपेनचीच साथ करिश्माला बिग बॉसच्या घरात मिळत होती.
या आठवड्यात उपेन व्यतिरिक्त सोनाली, डिंपी, करिश्मा, अली आणि प्रीतम नॉमिनेट झाले आहेत. ऐकिवात आहे, की या आठवड्यात घरातील तिघांवर बेघर होण्याची वेळ येणार आहे. त्यापैकी एक म्हणजे उपेनची घरातून एक्झिट झालेली आहे. आता दोन एविक्शन या आठवड्यात होतील. उर्वरित पाच सदस्य (एजाजला वगळून) 3 जानेवारीच्या एपिसोडमध्ये फायनलसाठी घोषित होतील.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'बिग बॉस'च्या घरातील उपेन पटेलची निवडक छायाचित्रे...