आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमबॅकसाठी तयार आहे अभिनेता विवियन दसेनाची पत्नी, कमी केले 10 किलो वजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फिटनेस ट्रेनर मन्सूर सैय्यदसोबत अभिनेत्री वाहबिज दोराबजी)
मुंबईः टीव्ही अभिनेत्री आणि विवियन दसेनाची पत्नी वाहबिज दोराबजीने गेल्या काही वर्षांपासून अभिनयाला रामराम ठोकला होता. त्याचे कारण होते तिची प्रकृती. हेल्श इश्यूजमुळे वाहबिज स्मॉल स्क्रिनपासून दूर झाली होती. प्रकृती अस्वस्थामुळे ती स्क्रिनवर फिट आणि हेल्दी दिसत नव्हती. मात्र आता प्रॉपर वर्कआउट आणि डाएट प्लान फॉलो करुन ती फिट अँड स्लिम झाली आहे. शिवाय आता कमबॅकसाठी तयार आहे.
divyamarathi.com ला दिलेल्या एक्सक्लूझिव्ह मुलाखतीत वाहबिजने सांगितले, ''काही वर्षांपूर्वी माझे वजन वाढले होते, मात्र मी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. नियमित चेकअप आणि ब्लड टेस्टला मी टाळत आले आणि एकेदिवशी कळले की मी हायपोथायरॉइडने त्रस्त आहे. आजाराविषयी कळायला फार उशीर झाला. त्यामुळे माझे वजन वाढत गेले. आजाराविषयी कळताच मी तात्काळ औषधोपचार सुरु केले. शरीराच्या प्रॉपर टोनिंगसाठी जिममध्ये वर्कआउट सुरु केले. माझे ट्रेनर मन्सूर सैय्यद यांच्या मदतीने मी 10 किलो वजन कमी केले आणि पुन्हा एकदा हॉट आणि सेक्सी लूक परत मिळवला.''
ट्रेनर मन्सूर सैय्यद यांनी एकता कपूर, रणदीप हुड्डा, वीर दास या सेलिब्रिटींना ट्रेन केले आहे. त्यांच्या मते, वाहबिज एक समर्पित आणि प्रामाणिक अभिनेत्री आहे. शेपमध्ये परतलण्यासाठी तिला कार्डिओ, ट्रेनिंग आणि रोप एक्सरसाइजची आवश्यकता होती. हे सर्व तिने मन लावून केले. आठवड्यातून चार ते पाच वेळा तिने दीड तास जिमिंग केले. शिवाय रुटीन प्रामाणिकपणे फॉलो केले. त्यामुळे रिजल्टसुद्धा परफेक्ट आला.
आपल्या डाएट प्लानविषयी वाहबिजने सांगितले, ''कॅलरी बर्न करण्यासाठी कॅलरीयुक्त जेवण गरजेचे आहे. सेक्सी लूक मिळवण्यासाठी हा बेस्ट मंत्र आहे. मी फायबरयुक्त फळे आणि हिरव्या भाज्यांचा जेवणात समावेश केला. कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांपासून दूर राहिले. प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगवेगळे असते. आपण कसा डाएट प्लान करावा, यासाठी न्युट्रिशिअनची मदत घेणे गरजेचे आहे. मी तुम्हाला सल्ला देऊ इच्छिते, की डाएटिंग सुरु करण्यापूर्वी न्यूट्रिशिअनची नक्की मदत घ्या. हेल्दी खा आणि फिट राहा.''
वाहबिजने 2010-11 याकाळात छोट्या पडद्यावर प्रसारित झालेल्या 'प्यार की एक कहानी' या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. शोमध्ये लीड रोलमध्ये झळकलेल्या विवियन दसेनासोबत 2013 मध्ये वाहबिज लग्नगाठीत अडकली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, जिममध्ये वर्कआउट करतानाची वाहबिज दोराबजीची छायाचित्रे...