आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Valentine Day: Aishwariya Sakhuja Candle Light Dinner With Life Partner

PHOTOS: या TV अॅक्ट्रेसने असा साजरा केला लग्नानंतरचा पहिला 'व्हॅलेंटाइन डे'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ऐश्वर्या सखूजा पती रोहित नागसोबत)
मुंबई- टीव्ही मालिका 'सास बिना ससुराल'मधून लोकप्रिय झालेली ऐश्वर्या सखुजा लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट करत आहे. यावेळी तिने काल (13 फेब्रुवारी) पती रोहित नागसोबत अंधेरी स्थित आपल्या आवडत्या रेस्तरॉ गोवा पोर्चुगीजामध्ये गेली होती आणि कँडल लाइट डिनर केले. divyamarathi.comने तिच्यासोबत केलेल्या बातचीतचे काही अंश तुमच्यासमोर सादर करत आहे.
बातचीतदरम्यान ऐश्वर्याने सांगितले, की लग्नापूर्वी तिने आणि रोहितने कधीच व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट केला नाही. ती म्हणते, 'जेव्हा आमत्या नात्याला सुरुवात झाली होती, तेव्हा रोहितने मला सांगितले होते, की आपले प्रेम दाखवण्यासाठी एका खास दिवसाची गरज नाहीये. आपल्यासाठी प्रत्येक दिवस प्रेमाचा आहे.'
ऐश्वर्याचे लग्न मागील वर्षी डिसेंबरमध्ये रोहित नागसोबत झाले. ते मागील 6 वर्षांपासून रिलेशनमध्ये आहेत. दोघांच्या लव्हस्टोरीविषयी रोहितला विचारले असता, त्याने सांगितले, 'मी ऐश्वर्याला मासिक आणि होर्डिंग्सवरच पाहिले होते. मी तिचा खूप मोठा चाहता होतो आणि तिच्यासोबत काम करायचे होते. एक दिवशी मी नॉन फिक्शन शोमध्ये ऑडिशन घेत होतो. त्यासाठी एका अँकरची गरज होती. माझ्या डोक्यात ऐश्वर्याचे नाव आले. मी प्रोजेक्ट डिल केली. त्यानंतर आम्ही एकत्र सिनेमा पाहणे, लंच, डिनर करण्यास सुरुवात केली. एक दिवशी मी तिली प्रपोज केले, तिने होकार देण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी घेतला. त्यानंतर मला म्हणाली, गुडघ्यावर बसून प्रपोज कर. आज आम्ही दोघे आनंदात आयुष्य जगतोय
6 वर्षे पहिले रोहितचे प्रपोजल स्वीकार करणे ऐश्वर्यासाठी सोपे नव्हते. ती म्हणते, 'रोहितने मला प्रपोज केला तेव्हा मी माझ्या आुष्यातील वाईट परिस्थितीला सामोरे जात होते. मला महित नव्हते माझे कोणत्या दिशेने जात आहे. माझ्या अशा परिस्थितीने कुणाचे आयुष्य गोंधळून जाऊ नये. परंतु एक महिन्यानंतर मला त्याची जाणीव झाली. मी रोहितसोबत आनंदी राहू शकते, असे वाटले.'
दोघांच्या लग्नाला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. आपल्या वैवाहिक जीवनाविषयी रोहितने सांगितले, 'मला लग्नानंतर जाणवले, की ऐश्वर्या खूप चांगले जेवण बनवू शकते.' आपल्या वैवाहिक जीवनाविषयी ऐश्वर्या सांगते, 'जेव्हा तुम्ही एका व्यक्तीसोबत 24 तास राहता, तेव्हा काहीतरी बदल घडतो. तुम्हाला त्याविषयी खूप काही माहित होते. तुम्ही चांगले आहात तर सर्व जग चांगले. लग्नानंतर आयुष्यात जास्त काही बदल होत नाही.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा व्हॅलेंटाइन डे स्पेशल कँडल लाइन डिनरदरम्यानची ऐश्वर्या आणि तिच्या पतीची छायाचित्रे...