आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Valentine\'s Days : Puneet Issar Revealed Their Love Story

V\'day: पुनीत इस्सरने शेअर केली Lover Story, पुन्हा करायचे आहे लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पत्नी दिपालीसोबत पुनीत इस्सर)
मुंबई- व्हॅलेंटाइन डे निमित्त 'बिग बॉस 8'मध्ये स्पर्धक म्हणून एंट्री केलेल्या पुनीत इस्सरने आपली पत्नी दिपालीसाठी खास प्लॅनिंग केले आहे. मात्र त्याची काय प्लॅनिंग काय आहे, हे मात्र त्याने सांगितले नाही. परंतु आपली लव्हस्टोरी त्याने आमच्यासोबत शेअर केली.
आपल्या आणि दिपालीच्या नात्याविषयी त्याने सांगितले, 'दिपाली आणि माझ्या लग्नाला 33 वर्षे झाले. परंतु आजसुध्दा मला वाटते, की आमचे लग्न आत्ताच झाले आहे. 1980मध्य मी दिपालीला पहिल्यांदा भेटलो आणि 1982मध्ये आम्ही लग्न केले. अर्थातच आम्ही एकमेकांना 35 वर्षांपासून ओळखतो. तेव्हा मी 20 वर्षांचा होतो आणि दिपाली 16 वर्षांची. आमचे लग्न लव्ह कम अरेंज मॅरेज होते. आम्ही भेटलो, माग प्रेम झाले आणि त्यानंतर आम्ही एकमेकांच्या पालकांना भेटवल. दोघांच्या घरच्यांनी परवानगी दिली. जोन वर्षांनंतर आम्ही लग्न केले. यावर्षी मी दिपालीसोबत पुन्हा लग्न करण्याचा विचार करत आहे. सलमान खान आणि माझे काही मित्र दिपालीला 'नानी' म्हणतात. ती माझ्यापेक्षा जास्त समजदार आहे. मी माझ्या घरात एखाद्या लहान मुलासारखा राहतो. मी माझ्या पत्नीपेक्षा एक चांगली मैत्रीण आहे.'
यावर्षी व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेशनविषयी पुनीतने सांगितले होते, 'यावर्षी आम्ही पार्टीची तयारी करत आहोत. आम्हाला पार्टीत जाणे चांगले वाटते. आम्ही नेहमी पब आणि डिस्कोमध्ये पार्टी करत असतो. आम्ही प्रवास करणे आवडते आणि व्हॅलेंटाइन डे साजरा करणेसुध्दा पसंत करतो.
सुरुवातीला आम्ही गोव्याला व्हॅलेंटाइन सेलिब्रेट करण्याचा विचार केला होता. मात्र त्यामध्ये थोडा बदल झाला.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पुनीतच्या घरात लावलेले त्याच्या पत्नी आणि मुलांचे काही फोटो...