आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DID Li\'l Masters: इलियानासोबत वरुण झाला रोमँटिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज आणि अभिनेता वरुण धवन सध्या त्यांच्या आगामी 'मैं तेरा हीरो' या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहे. अलीकडेच हे दोन्ही स्टार्स त्यांच्या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्सच्या सेटवर पोहोचले होते.
डीआयडीच्या सेटवर या दोन्ही स्टार्सनी भरपूर धमाल केली. सिनेमाचे प्रमोशन करण्यासोबतच या दोघांनी भरपूर डान्सही केला. लिटिल मास्टर्ससोबतची त्यांची धमाल बघण्यासारखी होती.
यावेळी वरुणचा रोमँटिक अंदाज उपस्थितांना पाहायला मिळाला. वरुणने त्याची को-स्टार इलियानाला उचलून डान्स केला.
बॉलिवूडचे कॉमेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक डेविड धवन हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. सिनेमात मेन लीड साकारणारा वरुण, डेविड धवन यांचा मुलगा आहे. पहिल्यांदाच वरुण आपल्या वडिलांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या सिनेमात मेन लीड साकारत आहे. वरुणने 2012मध्ये आलेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे आपल्या
फिल्मी करिअरला सुरुवात केली.
'मैं तेरा हीरो'मध्ये वरुण आणि इलियानासह नर्गिस फाखरीचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
काय आहे सिनेमाची पार्श्वभूमी...
वरुण धवनचे इलियाना डिक्रूजवर प्रेम असते. इलियानासह लग्न करण्याची त्याची इच्छा असते. याचदरम्यान या दोघांत एका व्हिलनची एन्ट्री होते. हा व्हिलन अभिनेता अरुणोद्य सिंहने साकारला आहे. तो एक भ्रष्ट पोलिस अधिकारी आहे.
अरुणोद्य कोणत्याही परिस्थितीत इलियानाशी लग्न करु इच्छितो. यासाठी तो बळजबरीसुद्धा करतो. नर्गिस फाखरीची एन्ट्री झाल्यानंतर कहाणीत ट्विस्ट येतो. नर्गिसचे वरुणवर जीवापाड प्रेम असते.
आता वरुण इलियाना की नर्गिस कुणाशी लग्न करणार हे सिनेमात बघावे लागणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा DID Li'l Mastersच्या सेटवर पोहोचलेल्या वरुण-इलियानाची खास छायाचित्रे...