आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Varun, Nargis, Illeana And Big B On The Sets Of Boogie Woogie

Boogie Woogie: \'भूतनाथ\'सह पोहोचले \'मैं तेरा हीरो\'चे स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एप्रिल 2014मध्ये बॉलिवूडचे बिग बजेट आणि बिग स्टारकास्ट असलेले सिनेमे रिलीज होणार आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन स्टारर 'भूतनाथ रिटर्न्स' आणि वरुण, इलियाना, नर्गिस फाखरी स्टारर 'मैं तेरा हीरो' या सिनेमांचा समावेश आहे. दोन्ही सिनेमांची रिलीज डेट जवळ आल्याने हे स्टार्स सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत.
अमिताभ बच्चन आणि वरुण, इलियाना, निर्गिस यांनी आपापल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'बुगी वुगी' या डान्स रिअॅलिटी शोची निवड केली. हे सर्व स्टार्स आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी या शोच्या सेटवर पोहोचले होते.
'मैं तेरा हीरो'च्या प्रमोशनच्या निमित्ताने 'बुगी वुगी'च्या सेटवर पोहोचलेले वरुण, इलियाना आणि नर्गिस बिनधास्त अंदाजात दिसले. मस्तीच्या अंदाजात त्यांनी आपल्या सिनेमाचे जोरदार प्रमोशन यावेळी केले.
दुसरीकडे 'भूतनाथ रिटर्न्स'च्या प्रमोशनच्या निमित्ताने बुगी वुगीच्या सेटवर पोहोचले अमिताभ बच्चन नेहमीप्रमाणे कूल दिसले.
कसा आहे 'भूतनाथ रिटर्न्स'?
'भूतनाथ रिटर्न्स' हा हॉरर कॉमेडी ड्रामा आहे. 2008मध्ये रिलीज झालेल्या 'भूतनाथ' या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. 'भूतनाथ'मध्ये बिग बी भूताच्या भूमिकेत होते, तर शाहरुख खान सहायक अभिनेत्याच्या रुपात झळकला होता. 'भूतनाथ रिटर्न्स'मध्ये अमिताभ यांच्यासह बोमन इराणी, अनुराग कश्यप आणि उषा जाधव महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. तर रणबीर कपूर आणि शाहरुख खान कॅमिओ रोलमध्ये दिसतील. हा सिनेमा 11 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.
कसा आहे 'मैं तेरा हीरो'?
'मैं तेरा हीरो' हा रोमँटिक अॅक्शन सिनेमा आहे. वरुण धवनचे इलियाना डिक्रूजवर प्रेम असते. इलियानासह लग्न करण्याची त्याची इच्छा असते. याचदरम्यान या दोघांत एका व्हिलनची एन्ट्री होते. हा व्हिलन अभिनेता अरुणोद्य सिंहने साकारला आहे. तो एक भ्रष्ट पोलिस अधिकारी आहे. अरुणोद्य कोणत्याही परिस्थितीत इलियानाशी लग्न करु इच्छितो. यासाठी तो बळजबरीसुद्धा करतो. नर्गिस फाखरीची एन्ट्री झाल्यानंतर कहाणीत ट्विस्ट येतो. नर्गिसचे वरुणवर जीवापाड प्रेम असते. आता वरुण इलियाना की नर्गिस कुणाशी लग्न करणार हे सिनेमात बघावे लागणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'बुगी वुगी'च्या सेटवर पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...