आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या पडद्यावर जेव्हा झाले चीरहरण, तेव्हा काय झाली द्रौपदीची अवस्था?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्टार प्लस वाहिनीवरील 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेत सध्या द्रौपदीचे चीरहरण हा सीक्वेन्स सुरु आहे. या मालिकेत द्रौपदीची भूमिका अभिनेत्री पूजा शर्मा साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच चीरहरणचा सीन शूट करण्यात आला असून या आठवड्यात तो प्रसारित केला जाणार आहे.
काय आहे चीरहरणची कथा -
एकेदिवशी पाच पांडव दुर्योधनासोबत सारीपाट खेळत असतात, हा खेळ खेळताना पांडव आपले साम्राज्य, संपत्ती, भाऊ आणि स्वतःला गमावून बसतात. अखेर द्रौपदीला पणाला लावण्यात येते. खेळात युधिष्ठिर तिलासुद्धा हरतात. तेव्हा दुर्योधन भर सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचे ठरवतो.
शुटिंगवेळी कशी होती पूजाची मनःस्थिती -
एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत पूजा शर्माने चीरहरणच्या सीनवेळी तिची झालेली अवस्था सांगितली. पूजाने सांगितले, की हा सीन शूट करताना कशी अवस्था झाली होती, ते शब्दांत व्यक्त करु शकत नाही. तिने सांगितले, अभिनेत्री म्हणून द्रौपदीच्या भूमिकेत मी समाधानी आहे. मात्र एख स्त्री म्हणून जेव्हा मी चीरहरणचा सीन शूट केला तेव्हा माझी झालेली मानसिक अवस्था मी शब्दांत सांगू शकत नाही. लेखक आणि निर्माता सिद्धार्थ कुमार यांनी कुणी कल्पनादेखील करु शकणार नाही एवढ्या चांगल्या पद्धतीने हा सीन चित्रीत केला आहे.
पूजा शर्माची पहिलीच मालिका -
दिल्लीत जन्मलेली पूजा शर्मा अभिनयात करिअर करण्यासाठी मुंबईत दाखल झाली. नशीबाची साथ मिळाली आणि तिला द्रौपदीची भूमिका मिळाली. यापूर्वी पूजाने कोणत्याही शोमध्ये काम केले नव्हते. महाभारत ही पूजा शर्माची पहिलीच मालिका आहे.
पूजाला द्रौपदीच्या रुपात तुम्ही छोट्या पडद्यावर बघत आहात. मात्र आम्ही तुम्हाला पूजाची खासगी आयुष्यातील खास छायाचित्रे दाखवत आहोत. पूजाची खासगी आयुष्यातील छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
नोट - ही सर्व छायाचित्रे पूजा शर्माच्या ऑफिशियल फेसबूक अकाऊंटवरुन घेण्यात आलेली आहेत.