Home »TV Guide» Veena Malik Alleges Husband Abused Her And Talk About Her Divorce

वीणा मलिकचा खुलासा, नव-याच्या मारहाणीला कंटाळून घेतला घटस्फोट

दिव्य मराठी वेब टीम | Mar 16, 2017, 15:09 PM IST

मुंबईः 'बिग बॉस'ची माजी स्पर्धक आणि पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक लग्नाच्या तीन वर्षांनी पती असद खटकपासून विभक्त झाली आहे. अलीकडेच त्यांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर वीणाने नव-यावर गंभीर आरोप लावले आहेत. वीणाने सांगितल्याप्रमाणे, असद तिला नेहमी मारहाण करण्यासोबतच फिजिकली-मेंटली एब्यूज करायचा. याला कंटाळून तिने घटस्फोटाचे पाऊल उचलले.

मुलाखतीत केले हे खुलासे...
वीणाने अलीकडेच एका पाकिस्तानी न्यूज वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैवाहिक आयुष्यासंबंधीत अनेक खुलासे केले. वीणा म्हणाली, "लोक म्हणतात, की मी पैशांसाठी लग्न केले. आज असदजवळचे पैसे संपले म्हणून मी त्याच्यापासून घटस्फोट घेतला. पण हे सत्य नसून ते काही वेगळेच आहे." अद्याप वीणाची ही मुलाखत टीव्हीवर प्रसारित झालेली नाही. असद तोडगा काढून लग्न टिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे. पण वीणाने पुन्हा असदसोबत जुळवून घेण्यासाठी स्पष्ट नकार दिला. आता मौलवींना मध्यस्थी केल्याने वीणा असदसोबत चर्चा करण्यासाठी तयार झाली आहे.

मागील महिन्यात झाला घटस्फोट..
वीणाने जानेवारी महिन्यात लाहोरच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात 33 वर्षीय वीणाने घटस्फोटाची याचिका दाखल केली. त्यानंतर कोर्टाने असदला समन पाठवला होता. पण असद कोर्टात न्यायाधीशांसमोर हजर राहिला नव्हता. अखेर कोर्टाने वीणाचा घटस्फोटाचा अर्ज मंजुर केला.

डिसेंबर 2013मध्ये झाले होते लग्न...
वीणाने डिसेंबर 2013 मध्ये दुबईस्थित बिझनेसमन असद खटकसोबत लग्न केले होते. 23 सप्टेंबर 2014 रोजी वीणाने मुलगा अबरामला जन्म दिला. त्यानंतर वर्षभराने अर्थातच 23 सप्टेंबर 2015 रोजी मुलगी अमालचा जन्म झाला.

'बिग बॉस'मुळे आली चर्चेत...
बॉलिवूडमध्ये वीणाने 'जिंदगी 50-50' आणि 'मुंबई 125 KM' या सिनेमांमध्ये काम केले. ती सर्वाधिक चर्चेत 'बिग बॉस 4' या शोमुळे आली होती. शोमध्ये वीणाला अश्मित पटेलसोबत इंटीमेट होताना बघितले गेले होते.

पुढील स्लाईड्सवर बघा, वीणा आणि असदचे निवडक PHOTOS...

Next Article

Recommended