आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वर्षांत 4 ठिकाणी राहिला भाड्याने, 16 व्या वर्षी 'वीर' ने खरेदी केले 1.6 कोटींचे घर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावेशचे घर. - Divya Marathi
भावेशचे घर.
मुंबई - टीव्ही शो 'एक वीर की अरदास: वीरा'(2012) फेम वीरा उर्फ दिगांगना सूर्यवंशीने काही दिवसांपूर्वी मुंबईत एक घर खरेदी केले होते. नुकतेच याच शोमधील छोट्या वीरची भूमिका करणाऱ्या भावेश बालचंदानीनेही मुंबईत नवे घर खरेदी केले आहे. भावेशचे नवे घर 1500 sq.ft मध्ये पसरलेले आहे. त्याची किंमत 1 कोटी 60 लाख आहे. भावेशने नुकताच या घरात गृहप्रवेश ठेवला होता. त्यात मित्र आणि कुटुंबीयांचा समावेश होता. यावेळी बावेशने आमच्या प्रतिनिधीशी खास बातचित केले. 

8 तास प्रवास करून शुटिंगला पोहोचायचा 
- भावेशने सांगितले की, तो वयाच्या 11 व्या वर्षी मुंबईत आला होता. त्यावेळी तो 'फुल्वा' नावाचा शो करत होता. त्यावेळी तो पॅरेंट्सबरोबर सूरत(गुजरात) वरून मुंबईला अप डाऊन करत होता. 
- आम्ही 8 तास रेल्वेचा प्रवास करायतो. माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी खूप स्ट्रगल केले आहे, असे भावेश म्हणतो. 5 वर्षे भाड्याच्या घरात राहिल्यानंतर अखेर आम्ही मुंबईत स्वतःचे घर खरेदी केले आहे. 
- 16 वर्षांचा भावेश सांगतो की, माझा स्ट्रगल पहिल्या दिवसापासून सुरू झाला होता. आर्थिक स्थितीमुळे मी तेव्हा इतरही काही शोमध्ये काम केले आहे. 
- सुरुवातीला आम्ही शुटिंगला जवळ पडेल अशा अपार्टमेंट्समध्ये राहायचो. या 5 वर्षांत आम्ही 4 वेगवेगळ्या अपार्टमेंट्समध्ये पाहिलो आणि आता घर खरेदी केले. 
 
असे आहे भावेशचे कुटुंब.. 
- भावेशचे वडील जगदीश बालचंदानी बिझनेसमन आहेत. सुरुवातीच्या दिवसांत त्यांचे मोबाईल शॉप होते, पण भावेशच्या शुटिंग शेड्युलमुळे त्यांनी मुंबईत व्यवसाय सुरू केले. 
- सध्या जगदीश कपड्यांचा व्यवसाय करत आहेत. तर भावेशची आई वीणा हाऊसवाइफ आहे. त्याचा एक मोठा भाऊ असून तो टीव्ही प्रोडक्शनमध्ये काम करतो. 

शिकण्यासाठी न्यूयॉर्कला जाण्याची इच्छा.. 
- भावेशने नुकतेच SSC पास केले आहे. त्यात त्याने 72 टक्के मिळवले आहेत. 
- लवकरच तो मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये अॅडमिशन घेणार आहे. कॉमर्समध्ये तो पुढील शिक्षण घेणार आहे. 
- त्याला भविष्यात शिक्षणासाठी न्यूयॉर्कच्या फिल्म अकॅडमीत डायरेक्शन आणि फिल्म मार्केटिंग कोर्स करायचा आहे. 
- अॅक्टींगसाठी पॅशनेट असलेल्या भावेशला कॅमेऱ्याच्या मागे राहण्याचीही इच्छा आहे. त्यामुळे तो डायरेक्शन करणार आहे. 
- सध्या भावेश 'बाल कृष्णा' मध्ये तरुणपणातील कृष्णाची भूमिका करतोय. पण तो लवकरच हा शो सोडणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामागचे कारण म्हणजे शाळेत 75 टक्के उपस्थिती गरजेची आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, भावेशच्या नव्या घराचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...