आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुटिंगदरम्यान सेटवरच बेशुद्ध झाली 'वीरा' मधील ही अॅक्ट्रेस, कॉस्च्युमचे वजन 20 किलो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टिवी अॅक्ट्रेस स्नेहा वाघ हिला नुकतीच सेटवर शुटिंगदरम्यान चक्कर आली होती. एक वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार स्नेहाने सांगितले की, उन्हाळ्यात एवढे हेवी कॉस्च्युम परिधान करून शुटिंग करणे अत्यंत कठिण असते. त्यामुले मी बेशुद्ध झाले होते. तसेच मला अन्नातूनही विषबाधा झाली होती. त्यामुळे माझी अवस्था आणखी खराब झाली. पण त्यादरम्यान मला टीमचे संपूर्ण कोऑपरेशन मिळाले. लगेचच डॉक्टरला बोलावण्यात आले. तसेच मधून मधून मला लिक्विडही देण्यात येत होते. 

स्नेहा सध्या हिस्टॉरिकल ड्रामा 'शेर-ए-पंजाब महाराजा रंजित सिंह'मध्ये राज कौरची भूमिका करत आहे. या शोमध्ये फिमेल लीड असल्याने स्नेहाला बराचवेळ शूट करावे लागते. त्यात ती जे कॉस्च्युम परिधान करते त्याचे वजन जवळपास 20 किलो असते.  स्नेहा 'एक वीर की अरदास...वीरा' द्वारे प्रसिद्ध झाली होती. 

पुढील स्लाइड्वर पाहा, स्नेहाच्या शुटिंगचे 2 फोटोज.. 
बातम्या आणखी आहेत...