(अभिनेत्री स्नेहा वाघ आपल्या पतीसोबत)
मुबंईः छोट्या पडद्यावरील 'वीरा' या गाजलेल्या मालिकेत बलदेव आणि वीरा यांच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्नेहा वाघ 29 जानेवारी रोजी विवाहबद्ध झाली. व्यवसायाने इंटेरियर डिझायनर आणि फायनान्सर असलेल्या अनुराग सोलंकीची निवड आपल्या जोडीदाराच्या रुपात केली.
'चट मंगनी पट ब्याह' करणा-या स्नेहाने सांगितले, "मी माझे खासगी आयुष्य लोकांपासून दूर ठेवते. अनुराग आणि माझी भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून गेल्यावर्षी मे महिन्यात झाली होती. त्यांनी दुस-याच भेटीत मला लग्नाची मागणी घातली. त्यावेळी मी त्यांना नकार दिला होता. मात्र जे नशीबात लिहिले असते, तेच घडते. हे माझे अरेंज मॅरेज आहे. कारण या लग्ना माझ्या आईवडिलांची संमती मिळाली आहे."
'ज्योती' या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली स्नेहा आता आपल्या पतीसोबत मोठ्या सुटीवर जात आहे. या दोघांनी हनीमूनसाठी बरीच सूटी घेतली आहे. त्यामुळे स्नेहा आता काही काळ 'वीरा' या मालिकेत दिसणार नाहीये. स्नेहाने सांगितले, "सुरुवातीला मला माझे खासगी आयुष्य सेटल करायचे आहे. त्यामुळे आम्ही दोघांनी मोठा हनीमून प्लान केला आहे. याच्याशी कोणतीही तडजोड करण्याची आमची इच्छा नाहीये."
स्नेहा आणि अनुराग यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला 'वीरा'चे निर्माते यश पटनायक पत्नी ममतासोबत लग्नात सहभागी झाले होते. याशिवाय शिविन नारंग आणि शगुफ्ता अली यांनीही नेहाला शुभेच्छा दिल्या.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्नेहा-अनुरागच्या लग्नाची निवडक छायाचित्रे...