आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तेरे शहर में' फेम ध्रुव भंडारीचे वडील आणि अभिनेते मोहन भंडारी यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : मुलगा ध्रुवसोबत मोहन भंडारी - Divya Marathi
फाइल फोटो : मुलगा ध्रुवसोबत मोहन भंडारी
मुंबईः प्रसिद्ध टीव्ही अभिनेते मोहन भंडारी यांचे गुरुवारी निधन झाले. दीर्घ काळापासून ब्रेन हॅमरेजशी लढा देत असताना गुरुवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी दुरदर्शनवरील 'खानदान', 'कर्ज', 'परंपरा' 'जीवन-मृत्यु', 'पतझड' आणि 'गुमराह' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले होते. याशिवाय 'प्रतिघात' (1987), 'बवंडर' (2000) आणि 'पहेली' (2005) या सिनेमांमध्येही ते झळकले.
'तेरे शहर में' फेम ध्रुव भंडारीचे वडील होते मोहन भंडारी
मोहन भंडारी यांचा मुलगा ध्रुव सध्या स्टार प्लस वाहिनीवरील 'तेरे शहर में' या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत त्याने मंटू श्रीवास्तव हे पात्र वठवले आहे. ध्रुव यापूर्वी 'रक्त संबंध' या मालिकेत आणि 'दिल तो बच्चा है जी' या सिनेमात झळकला आहे.
पुढे पाहा, मोहन भंडारी यांची कुटुंबीयांसोबतची छायाचित्रे...