आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इकडे टीव्ही अभिनेत्याचे झाले निधन, तिकडे पार्टी करण्यात दंग होते को-स्टार्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसिद्ध अभिनेते रागेश अस्थाना यांचे गुरुवारी (20 मार्च) पहाटे साडे चारच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. ते 51 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या करिअरमध्ये ऐंशीहून अधिक सिनेमे आणि मालिकांमध्ये अभिनय केला होता. कलर्स वाहिनीवरील 'ससूराल सिमर का' या मालिकेत त्यांनी काम केले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने अभिनय जगतात शोककळा पसरली आहे. मात्र या मालिकेतील कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहण्याऐवजी पार्टी करण्यात दंग दिसले.
'ससुराल सिमर का' या मालिकेत रागेश यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेत ते सिमरच्या शेजा-यांच्या भूमिकेत होते.
रागेश यांच्या निधनावर दुःख व्यक्त करण्याऐवजी या मालिकेतील कलाकार रश्मि शर्मा यांच्या 'साथ निभाना साथिया' या मालिकेच्या 1000 भाग पूर्ण होण्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत बिझी दिसले.
'ससुराल सिमर का' या मालिकेव्यतिरिक्त रागेश यांनी 'अगले जनम मोहे बिटिया ही किजो' आणि 'पालमपूर एक्स्प्रेस' या मालिकांमध्ये अभिनय केला होता. व्ही चॅनलवरील 'गुमराह' या मालिकेत ते शेवटचे झळकले होते.
वरील छायाचित्रात जरीना वहाब यांच्यासह रागेश अस्थाना. पुढील स्लाईड्सवर देण्यात आलेली सर्व छायाचित्रे रागेश यांच्या फेसबुक अकाउंटवरुन साभार घेण्यात आली आहेत...