आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोएडाला पोहोचलेल्या 'बिग बॉस'च्या विजेत्याने केली शिवीगाळ, Viral झाला व्हिडिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोएडा: 'बिग बॉस 10'चा विजेता मनवीर गुर्जर मंगळवारी त्याच्या घरी नोएडात पोहोचला. इंदिरा गांधी डोमेस्टिक एअरपोर्ट टर्मिनल 3, नवी दिल्ली येथे त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. त्याच्या स्वागतासाठी 1500 गाड्यांचा ताफा एअरपोर्टवर पोहोचल्याची माहिती आहे. कारवर स्वार होऊन चाहत्यांना अभिवादन करत आणि मित्रांचा सत्कार स्वीकारत मनवीर निघाला. या प्रवासातील व्हिडिओज आणि फोटोज मनवीरच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यापैकी एका व्हिडिओथ मनवीर चक्क शिवीगाळ करताना दिसतोय. त्याचा शिवीगाळ करताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

सेलिब्रिटींनी पछाडत मनवीर ठरला विजेता... 
'बिग बॉस'च्या दहाव्या पर्वाचा ग्रॅण्ड फिनाले रविवारी रात्री लोणावळ्यात झाला. यंदाच्या पर्वाचा मनवीर गुर्जर विजेता ठरला. मनोज कुमार बैसोया म्हणजेच मनवीर गुर्जर हा दुग्ध व्यावसायिक आहे. नाकाच्या शेंड्यावर राग असणारा हा ‘देसी मुंडा’ ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणाऱ्या स्पर्धकांच्या शर्यतीत सर्वापेक्षा वरचढ ठरला. मनवीर मुळचा नोएडाचा आहे. गुर्जर समाजसुधारणेसाठीच्या कामात हातभार लावणाऱ्यांमध्ये मनवीरचे नाव घेतले जाते. नोएडामध्ये तो अनेक सभा आणि मोर्चांमध्ये सक्रिय असतो. समाजहिताची कामे करण्याव्यतिरिक्त मनवीर त्याचा व्यवसाय आणि त्याच्या नावे असणारी एक डेअरी चालवतो. जनमताच्या आधारावर अखेर सामान्य वर्गवारीतून बिग बॉसच्या घरात वर्णी लागलेल्या मनवीर गुर्जर अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला स्पर्धक ठरला होता. 16 आक्टोबर पासून सुरु झालेल्या बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सेलिब्रिटी आणि सामान्य व्यक्ती अशा दोन वर्गवारीतून स्पर्धक सहभागी झाले होते. सेलिब्रेटीसारखी सामान्य स्पर्धकालाही लोकप्रियता मिळू शकते हे मनवीरने शेवटच्या टप्प्यात दाखवून दिले.

नोएडाला पोहोचलेल्या मनवीर गुर्जरचे Photos  आणि शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...