आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : 8 व्या वर्गात शिकते \'गंगूबाई\', दिग्दर्शिका व्हायचे आहे स्वप्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः स्टँडअप कॉमेडियन आणि बालकलाकार सलोनी दाणी टीव्ही इंडस्ट्रीत 'गंगूबाई' या नावाने प्रसिद्ध आहे. वयाच्या तिस-या वर्षी सलोनीने आपल्या करिअरची सुरुवात केली. 2009 मध्ये प्रसारित झालेल्या छोटे मियाँ या शोच्या माध्यमातून ती प्रसिद्धीझोतात आली. या शोची ती विजेतीसुद्धा ठरली होती. त्यानंतर तिने अनेक टीव्ही शोज केले. याशिवाय 'नो प्रॉब्लेम' या सिनेमातसुद्धा झळकली.
तसे पाहता प्रेक्षकांना सलोनीच्या करिअरविषयी बरेच काही ठाऊक आहे. मात्र तिच्या खासगी आयुष्यापासून ते अनभिज्ञ आहेत. Divyamarathi.com शो बोलताना सलोनीने आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या. आठव्या वर्गाची विद्यार्थिनी असलेल्या सलोनीला मोठे होऊन दिग्दर्शिका व्हायचे आहे. तिला मेकअप मुळीच पसंत नाहीये. ती आपल्या पाळीव कुत्र्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवणे पसंत करते. सलोनीच्या आईने सांगितल्यानुसार, ती खूप मस्तीखोर आणि हट्टी आहे. सलोनी फुडी असून तिची फेव्हरेट डिश चिकन आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मुलाखतीदरम्यान क्लिक झालेली सलोनीची खास छायाचित्रे...