आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्याने नाकारली होती 'झलक...'मध्ये माधुरीला रिप्लेस करण्याची ऑफर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक मोठ्या सेलिब्रिटीजना टीव्ही शोमध्ये होस्ट, परीक्षक किंवा परफॉर्म करण्यासाठी बोलावण्याचा ट्रेंड रुजू झाला आहे. अशीच एक ऑफर विद्या बालनलादेखील मिळाली होती. परंतू प्रकृती अत्यवस्थाचे कारण पुढे करून तिने ती ऑफर नाकारली.
सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, "विद्याला 'झलक दिखला जा'च्या सध्या सुरु असलेल्या पर्वात परीक्षक म्हणून बोलावण्यात आले होते. माधूरी दीक्षितने आधी या शोमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे, त्यामुळे यंदाच्या नवीन पर्वात चॅनलने माधुरीला रिप्लेस करण्याचा निर्णय घेतला होता. तिच्याजागी दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. चॅनलला वाटले की विद्या एक प्रामाणिक आणि मजेशीर परीक्षक होऊ शकली असती."
याबद्दल विद्याला विचारले असता ती म्हणाली, "हे बरं झालं की तुम्ही विचारलंत. नुकताच माझ्याकडून एक शो करता करता राहून गेला. मला ती ऑफर आली तेव्हा मला बरे वाटत नव्हते. म्हणून मला हा कठीण निर्णय घ्यावा लागला."
टीव्हीवर कोणत्या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये काम करायला आवडेल, डेली सोप करायला आवडेल का? असे विचारल्यावर ती हसत हसत म्हणाली, "नाही मी फक्त अशाच गोष्टी करू शकते, ज्याचा सिनेमा किंवा अभिनयाशी काही संबंध आहे. एखाद्या नवीन टॅलेंटला प्रोत्साहन देणारा देखील हा कार्यक्रम असू शकतो. मला सोपा जाईल असा या कार्यक्रमाचा फॉरमॅट असावा."