आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२० वर्षांनंतर विद्या पुन्हा वळणार छोट्या पडद्याकडे ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः विद्या बालन)

एकता कपूरच्या १९९५ मधील 'हम पांच' मालिकेद्वारे करमणूक जगतात पाऊल टाकणारी विद्या छोट्या पडद्याकडे वळणार आहे. यासाठी तिने सध्या एकही चित्रपट साइन केलेला नाही.

लहान पडद्यावर सध्या स्वच्छतेचा संदेश देत असलेल्या विद्या बालनने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही शोमधून केली होती. १० वर्षे छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर तिने 'परिणीता'द्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. 'हम पांच' हिट झाल्यानंतर टीव्ही कार्यक्रमांचे दिग्दर्शन करणाऱ्या अनुराग बसूने तिला एका डेली सोपची ऑफर दिली. मात्र चित्रपटाकडे वळलेल्या विद्याने पुन्हा छोट्या पडद्यावर येण्यास नकार दिला आणि चित्रपट सृष्टीतील तिची आगेकूच चालू राहिली.
सूत्रांच्या माहितीनुसार, विद्याला बऱ्याच दिवसांपासून टीव्ही चॅनलवरील शोसाठी प्रस्ताव येत होते. मात्र विद्या एका दमदार शोच्या प्रतीक्षेत होती. सध्या तिला आलेल्या शोच्या प्रस्तावाचा कंटेट आवडला असून त्यासाठी तिने सध्या एकही चित्रपट साइन केला नाही. 'हमारी अधुरी कहानी' नंतर आगामी चित्रपट कोणता? यावर ती म्हणते की, मलाच माहीत नाही की माझा आगामी चित्रपट कोणता असेल? कदाचित माझा पुढचा प्रोजेक्ट हा टीव्ही शो देखील असू शकतो.'
टीव्ही शोबाबत बोलताना विद्या म्हणाली की, मला एका चॅनलच्या शोचा प्रस्ताव आला आहे. जर या शोची थीम मला आवडली तर मी हा शो करण्यास प्राधान्य देईन. या शोसाठी मला ४-५ महिन्यांचा वेळ द्यावा लागेल. या कालावधीत मी चित्रपटाची शूटिंग करू शकणार नाही त्यामुळे मी सध्या सर्व चित्रपटांचे प्रस्ताव रोखले आहेत.
एका परीक्षकाच्या भूमिकेत मी टीव्हीवर दिसू शकते. वास्तविक याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप मी केलेली नाही. आज माझी काम करण्याची पद्धतच बदलली आहे. यापूर्वी मी फिक्शन कॉमेडी शो केला. मात्र हा शो एकदम वेगळा असल्याने मी छोट्या पडद्याकडे पुन्हा वळणार आहे.