आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कंटेस्टंटला हवी आहे 'बिग बॉस'मधून एक्झिट, 2 कोटी रुपये दंड भरण्यासही तयार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विकास गुप्ताचे बिगा बॉसच्या घरात शिल्पा शिंदेसोबत वाद वाढत आहे. - Divya Marathi
विकास गुप्ताचे बिगा बॉसच्या घरात शिल्पा शिंदेसोबत वाद वाढत आहे.
मुंबई - 'बिग बॉस-11' मध्ये सेलिब्रिटी कंटेंस्टंट विकास गुप्ता शो अर्धवट सोडण्याच्या तयारीत आहे. एका लीडिंग एंटरटेनमेंट वेबसाइटने दावा केला आहे की विकास घरातील इतर सदस्यांमुळे एवढा त्रस्त झाला आहे, की त्याने 'बिग बॉस'ला विनंती केली आहे की त्याला घरातून बाहेर काढावे. एवढेच नाही तर, शो सोडण्यामुळे जो करार मोडणार आहे त्याची भरपाई म्हणून 2 कोटी रुपये पेनल्टी देण्याचीही त्याची तयारी आहे. 
 
शिल्पानंतर प्रियंकसोबतही विकासचे भांडण 
- 'बिग बॉस'च्या प्रीमियरपासून आतापर्यंत जवळजवळ प्रत्येक एपिसोडमध्ये विकास आणि शिल्पाचे भांडण झालेले पाहायला मिळाले आहे. 
- दोघे फक्त एकमेकांना टोमणे मारत नाही तर जाणिवपूर्वक एकमेकांची टांग खेचण्यास पुढे असतात. 
- 'बिग बॉस'च्या घरात फक्त शिल्पाच नाही तर आता प्रियंक शर्मासोबतही विकासचे भांडण वाढत चालेले आहे. 
- दुसऱ्या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात प्रियंक आणि विकासचे भांडण पाहायला मिळाले. कॅप्टनसीच्या टास्कवरुन त्यांच्यात वाद झाला होता. त्यामुळेच दोघांनी एकमेकांपासून अंतर ठेवून वागण्यास सुरुवात केली होती. 
- प्रियंक शर्मा आणि विकास गुप्ता रियल लाइफमध्ये एकमेकांचे चांगले मित्र आहेत, मात्र शोमध्ये त्यांच्यात फक्त भांडणच पाहायला मिळत आहे. 
 
ज्योतीच्या एविक्शनने एकटा पडला विकास 
- गेल्या आठवड्यात शोमधून बाहेर पडलेली कंटेस्टंट ज्योती कुमारीच्या जाण्याने शोमध्ये विकासचा क्लोज फ्रेंड कोणीही राहिलेला नाही. 
- ज्योतीच्या एविक्शनने विकास दुःखी झाला होता, तो रडला देखील होता. तेव्हा तो म्हणाला होता, की मी ज्योतीला खूप मिस करेल. 
- शोमध्ये ज्योती त्याला जेवण देणे, चहा देणे असे अनेक छोटी-मोठी कामे करत होती. आता तिच्या जाण्याने तो एकटा पडला आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अर्शी खानसोबत विकास गुप्ता.. 
बातम्या आणखी आहेत...