आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Violent Fight Between Ex Big Boss And Transgender Stylist

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'BIGG BOSS\'चा माजी स्पर्धकाचे स्टाइलिस्टसोबत झाले कडाक्याचे भांडण, चेह-यावर फेकली ड्रिंक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- विवेक मिश्रा आणि स्टाइलिस्ट सिल्वी)
मुंबई: अलीकडेच, गुंडगावमध्ये झालेल्या डॉ. अमित भसीनच्या पार्टीत 'बिग बॉस 7'चा स्पर्धक विवेक मिश्रा आणि ट्रान्सजेंडर स्टाइलिस्ट सिल्वीमध्ये कडाक्याचे भांडण झाले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, सिल्वीने हातातील काचेची बॉटल विवेकच्या दिशेने भिरकावली आणि रागात असलेल्या विवेकने तिच्या चेह-यावर ड्रिंक फेकली.
का झाले भांडण?
उपस्थितांच्या मते, पाश्चिमात्य गायिका अनामिकामुळे या भांडणाला सुरुवात झाली. पर्सनल पार्ट्यामध्ये अनामिका सामील का होत नाही? यावरून सिल्वी तिच्याशी भांडत होती. सिल्वीने तिच्याविषयी काही अपशब्दांचासुध्दा वापर केला. अनामिकासोबत केलेल्या या गैरवर्तणूकीचा विवेकला राग आला आणि त्याने सिल्वीसोबत वाद घातला.
सिल्वीचे तर्क
या प्रकणाविषयी सिल्वीशी बातचीत केल्यानंतर तिला आश्चर्य वाटले आणि ती म्हणाली, 'मला कळतं नाही, की तुम्हाला या भांडणाविषयी कसे कळाले. मी अनामिकाला गेल्या 25 वर्षांपासून ओळखते. मी तिच्याशी बातचीत करून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत होते. पण ती रडायला लागली. त्यावेळी विवेक मिश्रा तिथे आला. त्याला आमच्या दोघींमध्ये बोलण्याचा काहीच अधिकार नव्हता. एवढेच काय, मी त्याला ओळखतसुध्दा नाही. त्याने माझ्या चेह-यावर सॉफ्ट ड्रिंक फेकली. या गैरवर्तणूकीसाठी त्याला त्याची शिक्षा मिळेल. मोठ्यांशी कसे वागायचे याचा धडा मी त्याला शिकवणार आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा विवेक आणि अनामिकाचे या प्रकरणावर काय म्हणणे आहे...?