मुंबई- अलोकनाथ, यामी गौतम आणि
आलिया भट्टनंतर आता '
बिग बॉस'ची स्पर्धक संभावना सेठ
आपल्या वागणूकीने सोशल मीडियावर टार्गेट झाली आहे. सोशल साइट्सवर तिची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.
जेव्हा संभावना 'बिग बॉस'च्या घरात चॅलेंजरच्या रुपात आली होती, तेव्हा तिचे आणि डिम्पीचे जोरदार भांडण झाले होते. एवढेच नव्हे तिने डिम्पीला बूट फेकून मारला होता.
भारदस्त आवाजासाठी ओळखली जाणारी संभावना घरात आल्यापासून काही ना काही ड्रामा करताना दिसते. तिच्या याच वागणूकीकडे पाहून सोशल साइट्सवर तिला टार्गेट करण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा संभावना सेठची सोशल साइट्सवर कशी खिल्ली उडाली...