आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूझरने म्हटले होते \'वेश्या\', या मराठी अभिनेत्रीने दिले असे उत्तर!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुषा दांडेकर आणि करण कुंद्रा - Divya Marathi
अनुषा दांडेकर आणि करण कुंद्रा
मुंबई: मागील दिवसांत अनुषा दांडेकरला 'वेश्या' म्हटल्यानंतर तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा एका यूझरवर भडकला होता. आता अनुषानेसुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल शोच्या पत्रकार परिषदेत अनुषाला या प्रकरणावर तुझी काय प्रतिक्रिया आहे, असे विचारण्यात आले होते. उत्तर देताना ती म्हणाली, 'जेव्हा लोक कमेंट करतात तेव्हा ते लॅपटॉप किंवा फोन मागे लपलेले असतात.'
आणखी काय म्हणाली अनुषा...
'स्वत:च्या भावना व्यक्त करणे चांगली गोष्ट आहे. फक्त त्या चांगल्या पध्दतीने व्यक्त करायला हव्यात. विचार मांडण्यासाठी अनेक मार्ग आहेत. जर तुमच्याकडे सांगण्यासाठी काही चांगले नाहीये तर तर शांत राहा. परंतु तरीदेखील तुम्हाला काहीतरी सांगायचे असेल तर ते योग्यपद्धतीने मांडा.'
काय आहे प्रकरण?
- टीव्ही अभिनेता आणि होस्ट करण कुंद्राची गर्लफ्रेंड अनुषा दांडेकरने 27 जूनला एक सिझलिंग फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता.
- अनुषाच्या हॉट फोटोवर @kkundra00 नावाच्या यूझरने कमेंट बॉक्समध्ये करण कुंद्राला टॅग करून लिहिले, 'ती वेश्यासारखी दिसते. हा चांगला फोटो नाहीये. तू तिला कसे गर्लफ्रेंड बनवू शकतो. ती निर्लज्ज आहे.'
- ही कमेंट वाचल्यानंतर करणने मोठी पोस्ट लिहून टिकाकाराला उत्तर दिले. भडकलेल्या करणने लिहिले, 'माझा फोटो आणि नाव वापरणारे चाहते मला नकोत. ज्यांची विचार करण्याची क्षमता इतक्या खालच्या पातळीची आहे.'
- त्या यूझरला उत्तर देताना करणने लिहिले, 'तुझ्या या कमेंटवरून असेच वाटते, की तुझ्या आई-वडिलांनी तुला हेच शिकवले. मी तुला नाही या गोष्टीसाठी तुझ्या कुटुंबाला दोष देतोय.'
- अनुषाबाबत अश्लिल कमेंट करण्यापासून करणचा फोटो आणि नाव वापरण्यावरूनसुध्दा त्याने यूझरला झापले.
- काही वेळानंतर सर्व कमेंट आणि @kkundra00 नावाचे अकाऊंट इंस्टाग्रामवरून डिलीट झाले.
एअरपोर्टवर पहिल्यांदा भेटले होते करण-अनुषा...
- अलीकडेच divyamarathi.comला दिलेल्या एका मुलाखतीत करणने कबूल केले होते, की तो अनुषाला डेट करतोय आणि दोघे एकमेकांमुळे आनंदी आहेत.
- करणने सांगितले होते, 'आम्ही दोघांनी एकत्र एमटीव्हीसाठी काम केले. परंतु अनुषासोबत माझी पहिली भेट एअरपोर्टवर झाली. आम्ही एमटीव्हीच्या एका शोसाठी यूरोपला जात होतो. यूरोप ट्रिपमध्ये आम्ही 6-7 दिवस एकत्र राहिलो. त्यादरम्यान एकमेकांना समजून घेतले आणि मैत्री झाली.'
- दोघांचे इंस्टाग्राम अकाऊंट एकमेकांच्या क्युट फोटोंनी ओसांडून वाहत आहे. सध्या दोघे एकमेकांची कंपनी एन्जॉय करत आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अनुषा आणि करणचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...