Home »Bollywood »Marathi Cinekatta» Vote For Shivam Wankhede Of Mad 2 Dance Show On Colors Marathi Channel

2 MAD: अहो, ही नृत्यांगणा नाही, जळगावचा शिवम वानखेडे, टाॅप 8 मध्ये धडक

दिव्य मराठी वेब टीम | Mar 27, 2017, 13:08 PM IST

जळगाव- कलर्स मराठी या टीव्ही चॅनलवरील '2-मॅड' या डान्स शोमध्ये ग्लॅडियर डान्स क्लासेसचा डान्सर आणि जळगाव येथील आर.आर. विद्यालय आणि एम.जे. कॉलेजचा माजी विद्यार्थी शिवम वानखेडे याने धडक दिली आहे. नुसती धडक दिली नाही तर 'बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द वीक' अवार्डही पटकावला आहे.

'2- मॅड' चा गोविंदा'चा असलेला शिवम हा टॉप-8 मध्ये पोहोचणार आहे. त्याला नृत्याची अतिंम फेरी गाठण्यासाठी आपल्या अमुल्य वोटची आवश्यकता आहे. 27 मार्चपासून बोटिंग लाईन सुरु होणार आहे. भरभरुन वोटिंग करून शिवमला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी बळ द्यावे, असे आवाहन त्याचे नृत्यशिक्षक अखिल तिलकपुरे आणि आईवडील शिरीष वानखेडे व सुवर्णा वानखेडे यांनी केले आहे.

कलर्स मराठीवर सोमवार आणि मंगळवारी रात्री 9:30 वाजता प्रसारित होणार्‍या '2- मॅड' या डान्स शोसाठी एकूण 20 स्पर्धकांची निवड झाली होती. त्यातून केवळ टॉप-10 स्पर्धक निवडण्यात आले. त्यात शिवम वानखेडे याने बाजी मारली आहे. शिवमने 'जम्मे की रात' या गाण्यावर नृत्य सादर केले होते. गेल्या आठवड्यात शिवमने 'झांज ज रीया' या गाण्यावर बेधडक नृत्य करून परीक्षकांकडून कौतुकाची दाद मिळवली. तसेच तमाम प्रेक्षकांची मने जिंकली. 'बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द वीक'चा तो मानकरी ठरला.

आज (27 मार्च, साेमवारी) हाेणाऱ्या '2- मॅड' डान्स शोमध्ये शिवम लावणीनृत्य सादर करणार आहे. यावेळी तो नृत्यागणेच्या वेशभूषेत दिसणार आहे. या वेशभूषेत तो हुबेहूब मुलगीच वाटेल, असा त्याने मेकअप केला अाहे. त्याचे सादरीकरण झाल्यानंतर वाेटिंग लाइन सुरू हाेणार आहे. नंतर त्याला वाेटिंग करता येणार अाहे. वोटींग लाईन 12 तासापर्यंत असेल. एक मोबाइल यूजर शिवमला 100 एसएमएस पाठवून वोटींग करू शकतो. एसएमएसमध्ये SHIV टाईप करून 56882 या क्रमांकावर पाठवून मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

पुढ‍ील स्लाइडवर क्लिक करून पाहा,'2- मॅड'चा गोविंदा अर्थात शिवम वानखेडे याचे मुलीच्या वेशभुषेतील फोटोज आणि व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended