आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Was Deepika Singh High On Alcohol At The Star Parivaar Awards?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टार परिवार अवॉर्ड्समध्ये दारु पिऊन दाखल झाली होती 'दीया और बाती'मधील संध्या!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्टार परिवार अवॉर्ड्स-2014च्या दरम्यान दीपिका सिंह)
मुंबई - स्टार प्लस वाहिनीवरील 'दीया और बाती हम' या मालिकेतील संध्या उर्फ दीपिका सिंह टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सून म्हणून ओळखली जाते. स्मितहास्य आणि शानदार अभिनयाच्या बळावर दीपिकाने आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मात्र अलीकडेच तिच्याविषयी एक धक्कादायक गोष्ट उघड झाली आहे. ऐकिवात आहे, की रविवारी मुंबईत पार पडलेल्या स्टार परिवार अवॉर्ड्स सोहळ्यात दीपिका दारु पिऊन दाखल झाली होती.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, इवेंटच्या सुरुवातीलाच दीपिका भरपूर दारु प्यायली. ती यावेळी थकलेली दिसत होती. त्यामुळे इवेंटवेळी फ्रेश दिसण्यासाठी तिने मेकअप केला होता. या बातमीने तिच्या चाहत्यांप्रमाणेच आम्हालाही आश्चर्यचकित केले. सत्य जाणून घेण्यासाठी dainikbhasakar.com ने दीपिकाची बातचित केली.
दीपिका म्हणाली, ''काय मुर्खपणाची बडबडल आहे? माझ्याविरोधात कोण अशाप्रकारच्या अफवा पसरवत आहेत? मी डाएटवर आहे. त्यामुळे दारुऐवजी केकचे तुकडे खाणे मी पसंत करेल. मी त्या दिवशी दारु प्यायले नव्हते. चार दिवस सतत शूट करणे सोपे काम नाहीये, त्यामुळे कदाचित मी दमलेली दिसत असेल. मी स्टेजवर एक शानदार परफॉर्मन्ससुद्धा दिला. शिवाय पुरस्काराने मला सन्मानितसुद्धा करण्यात आले. ही बातमी खोटी आहे. मला ठाऊक आहे, की कोण माझ्याविरोधात असा कट रचत आहे. मी दारु सोडून अनेक महिने झाले आहेत.''
असो आता सत्य काय हे तर दीपिकालाच ठाऊक. मात्र या बातम्यांच्या परिणाम तिच्या लोकप्रियतेवर पडला नाही, म्हणजे मिळवलं.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या 'दीया और बाती हम'मध्ये काय आहे दीपिकाची भूमिका आणि तिच्या रिअल लाइफविषयी...