आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Was Rahul Raj Cheating Pratyusha Banerjee By Dating This Girl?

या अभिनेत्रीसाठी बॉयफ्रेंडने दिला धोका आणि प्रत्युषाने केली आत्महत्या?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून, प्रत्यूषा बॅनर्जी, सलोनी शर्मा आणि राहुल राज सिंह - Divya Marathi
डावीकडून, प्रत्यूषा बॅनर्जी, सलोनी शर्मा आणि राहुल राज सिंह
मुंबई: 'बालिका वधू' फेम आनंदी अर्थातच प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली आहे. प्रत्युषाने हे पाऊल बॉयफ्रेंडकडून मिळालेल्या धोक्यामुळे उचलल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, राहुलचे सलोनी शर्मा नावाच्या अभिनेत्रीसोबत अफेअर चालु होते. मात्र, स्वत: सलोनीने याचे खंडन केले आहे.
काय म्हणाली सलोनी...
dainikbhaskar.comसोबत बातचीत करताना सलोनी म्हणाली, 'माझे या प्रकरणाशी काही एक घेण देणे नाहीये. मला माहित नाही, लोक माझे नाव का घेताय. मी कधीच प्रत्युषासोबत बोलले नाही. सर्व आरोप निरर्थक आहेत. हे राहुल आणि प्रत्युषा यांचे प्रकरण आहे, माझे याच्याशी काही संबंध नाहीये. मी कधीच त्याच्यासोबत सामील झाले नाही. हे खोटे आहे, की मी राहुलला डेट करतेय.'
सलोनी आणि राहुलच्या नात्याविषयी अनेकांना आहे माहिती...
सलोनी आणि राहुल यांच्या नात्याविषयी इंडस्ट्रीत अनेक लोकांना ठाऊक आहे. एका मुलाखतीदरम्यान डॉली बिंद्राने सांगितले होते, 'राहुल सलोनी शर्मा नावाच्या तरुणीच्या संपर्कात आहे. त्याचे प्रत्युषासोबत होणा-या वादाचे हेच कारण असावे. इंडस्ट्रीसाठी ही खूपच शॉकिंग बातमी आहे.'
कोण आहे सलोनी शर्मा....
कोलकात्यात जन्मलेली आणि लहानाची मोठी झालेली सलोनी शर्मा मुंबईमध्ये अभिनेत्री होण्यासाठी आली आहे. तिला पहिला ब्रेक 'फिरंगी बहू'मधून मिळाला. या मालिकेत ती नकारात्मक भूमिका साकारत होती. याशिवाय, तिने 'आहट'मध्ये कॅमियो केले आहे. सध्या ती 'संतोषी मां' मालिकेत प्रियाची भूमिका साकारत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलोनी शर्माचे काही फोटो...