आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानच होस्ट करणार \'बिग बॉस 8\', पाहा TEASER

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बिग बॉस 8'च्या टीजरमधील अभिनेता सलमान खानचा लूक)
बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या निर्मात्यांनी आठव्या सीझनचा टीजर अलीकडेच रिलीज केला आहे. यासोबतच शोच्या होस्टच्या रुपात पुन्हा एकदा सलमानच परतण्याचे संकेत मिळाले आहेत। मागील पर्व संपल्यानंतर सलमान खानने पुढील सीझनसाठी उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासूनच शोचे नवीन होस्ट शाहरुख खान रणवीर कपूर राहील, अशी चर्चा सुरू होती. मात्र यावेळीही शोचा होस्ट सलमानच असणार आहे.
शोच्या 30 सेकंदाच्या जाहिरातीत सलमानला एका फ्लाइटसाठी तयार होताना दाखवले आहे.
त्याने पायलटचा युनिफॉर्म घातला आहे तो हसत सेल्युट करतो. आतापर्यंत सलमान या शोचा चार सीझनचा होस्ट राहिलेला आहे. मागील पर्वात तनीषा अरमान कोहली यांच्या सोबत कठोर शब्दात बोलल्याच्या आरोपावरुन सलमानला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला होता. यावर त्याने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'बिग बॉस 8'मधील सलमानचा नवीन लूक आणि 'बिग बॉस 8'चे टीजर...