आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Promo : बिग बॉस 9 मध्ये सलमानचा 'Double Trouble' धमाका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः वादग्रस्त टीव्ही शो बिग बॉसच्या नवव्या पर्वाचा प्रोमो रिलीज झाला आहे. यंदासुद्धा सलमान खानच हा शो होस्ट करताना दिसणार आहे. 'बिग बॉस डबल ट्रबल' या नावाने हा शो प्रसारित होणार आहे. बिग बॉस सिझन 9ची थिम डबल ट्रबल आहे. प्रोमोमध्ये एका मोठ्या शर्टमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी दिसतेय. ज्यांना सलमान बिग बॉसच्या डोळ्यातून पाहतोय.
यानंतर सलमान म्हणतो, ''यहां एक करेगा दूसरे को ट्रबल क्योंकि वन प्लस वन इज डबल ट्रबल. इफ यू वांट टू नो हाऊ देन यू वॉच बिग बॉस नाउ''.
'बिग बॉस'चे नववे पर्व 'झलक दिखला जा रिलोडेड'नंतर सुरु होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, येत्या 11 ऑक्टोबरपासून रात्री 10.30 च्या सुमारास हा शो छोट्या पडद्यावर प्रसारित केला जाणार आहे.