आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Watch Personal Life Pics Of Kapil Sharma\'s On Screen Wife

भेटा कपिल शर्माच्या ऑनस्क्रिन पत्नीला, बघा काही खासगी छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या कॉमेडी टॉक शोला दिवसेंदिवस बरीच लोकप्रियता मिळत आहे. हा शो जितक प्रेक्षकांसाठी हसण्याचे ठिकाण आहे. त्यापेक्षा अधिक स्टार्ससाठी आपल्या सिनोमाचे प्रमोशन करण्याचे मोठे प्लॅटफॉर्म आहे.
एकिवात आहे, की बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनसुध्दा या शोच्या सेटवर आपल्या 'भूतनाथ रिटर्न्स'च्या प्रमोशनसाठी येणार आहे. तसे पाहता, शोमधील प्रत्येक सदस्याने आपली खास ओळख निर्माण केली आहे. बुआ तिच्यासाठी प्रत्येक येणा-या पाहूण्यामध्ये स्वत:साठी पती शोधते, दादीची शगुन पप्पी देण्याचा अंदाज आणि नौकराचे कपिलसोबतचे भांडण. हे सर्व प्रकार प्रेक्षकांना लोटपोट हसायला भाग पाडतात. परंतु या शोमध्ये एक असेही पात्र आहे, जे प्रत्येकवेळी कपिलच्या टिकांनी प्रेक्षकांना हसायला लावते.
आम्ही सांगतोय बिट्टू शर्मा अर्थातच कपिलची ऑनस्क्रिन पत्नी सुमोनाविषयी. सुमोना आणि कपिलचे छोटे-मोठे भांडण सर्वांनाच हसायला लावते. जाणून घेऊया सुमोनाच्या ख-या आयुष्याविषयी काही खास गोष्टी.
उत्तरप्रदेशमधून शिक्षण केले पूर्ण
मुंबईमध्ये राहणा-या सुमोनाने लोरेटो कान्वेंट स्कुल, लखनऊ उत्तर प्रदेश आणि हीरानंदानी फाउंडेशन स्कुल, मुंबई येथून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. मुंबईच्या जय हिंद कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या सुमोनाच्या कुटुंबात आई-वडिलांव्यतिरिक्त एक धाकटा भाऊसुध्दा आहे. तिचे वडील श्रीलंकेमध्ये कार्यरत आहेत. 1997पासून तिचे कुटुंबीय मुंबईमध्ये राहत आहे.
आमिर खानसोबत केले आहे काम
कदाचितच कुणाला माहित असेल, की सुमोना चक्रवर्तीने बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थातच आमिर खानसोबतसुध्दा काम केले आहे. तिने 1999मध्ये आलेल्या अनिल कपूर आणि मनीषा कोयराला अभिनीत 'मन' सिनेमात एक बालकलाकार म्हणून काम केले आहे. त्यावेळी तिचे वय केवळ 12 वर्षे असून ती 6वीच्या वर्गात शिकत होती.
अनेक मालिकांमध्ये केला आहे अभिनय
सध्या 'कॉमेडी नाइट्स...'मध्ये कपिलची ऑनस्क्रिन पत्नीची भूमिका साकारणा-या सुमोनाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. दूरदर्शनच्या 'कब क्यो कैसे'(2009), झी टीव्हीच्या 'कसम से' (2006-2009), बिनधास्त चॅनलच्या 'सुन यार चिल मार'(2007), स्टार प्लस चॅनलच्या 'कस्तूरी'(2007-2009), आणि सोनी एंटरटेनमेन्ट चॅनलवरील 'बडे अच्छे लगते है' (2011)सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने दमदार अभिनय करून आपली ओळख निर्माण केली आहे. सुमोना अभिनयासोबतच मॉडेलिंगसाठीसुध्दा ओळखली जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा कपिलच्या ऑनस्क्रिन पत्नीची खासगी आयुष्यातील काही खास छायाचित्रे...
नोट: सुमोनाची वरील सर्व छायाचित्रे टि्वटर अकाउंटवरून घेतली आहेत.