मुंबई- '
बिग बॉस 9'मधून बाहेर पडल्यानंतर किश्वर मर्चेंटने यावर्षी लग्न करणार असल्याचे सांगितले. हा खुलासा तिने शोमधून इव्हिक्ट झाल्यानंतर एका मुलाखतीत केला. किश्वरच्या सांगण्यानुसार, 'सुयश आणि मी यावर्षी लग्नगाठीत अडकणार आहोत. लग्न पोस्टपोन करण्यात आले, कारण सध्या मी BCLमध्ये (बॉक्स क्रिकेट लीग) बिझी आहे. 'बिग बॉस'च्या फिनालेनंतर आम्ही (सुयश आणि किश्वर), किथ, प्रिन्स, रोशेल, युविका चौधरी आणि रिमी एकत्र छोटीसी ट्रिप प्लान करणार आहोत. त्यानंतर पाहू.'
'प्यार की यह एक कहाणी'च्या सेटवरून सुरु झाली किश्वर-सुयशची लव्हस्टोरी...
सुयश आणि किश्वर लोकप्रिय टीव्ही मालिका 'प्यार की यह एक कहाणी'च्या (2010-2011) सेटवर पहिल्यांदा भेटले होते. चार महिन्यांने एकमेकांविषयी जाणून घेतल्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये आले. 2014मध्ये 'खुशनुमा' नावाच्या एका व्हिडिओमध्ये दोघे एकत्र दिसले होते. 'बिग बॉस 9'मध्येसुध्दा दोघे सोबत पोहोचले होते. परंतु आधी सुयश 'बिग बॉस'मधून बाहेर पडला आणि दोन आठवड्यांनी किश्वर बाहेर आली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किश्वर आणि सुयशचे निवडक फोटो...