आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नात सास-यासोबत धरला ताल, पाहा या TV अभिनेत्रीच्या वेडिंगचे Inside Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पती रोहित नागसोबत ऐश्वर्या सखूजा)
मुबंई- टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल ऐश्वर्या सखूजाने 5 डिसेंबर 2014 रोजी बॉयफ्रेंड रोहित नागसोबत सप्तपदीचे सात फेरे घेतले. हा लग्नसोहळा नवीन दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला होता. लग्नाच्या सर्व विधी पारंपरिक पध्दीतीन पार पडल्या. पूजा शर्मा, करण वाही, साहबान असीम आणि रोहित बॅनर्जीसारखे टीव्ही स्टार्स आणि ऐश्वर्याचे मित्र परिवार त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी लग्नसोहळ्यात पोहोचले.
लग्नात उपस्थित एका सूत्राने सांगितले, ऐश्वर्याने आपल्या लग्नासोहळ्याला खूप एन्जॉय केले. सर्व विधी अविस्मरणीय राहतील असा प्रत्येक क्षण तिने घालवला. विशेष म्हणजे, मेंदी समारंभादरम्यान ऐश्वर्याने सास-यांसोबत 'लुंगी डान्स' गाण्यावर डान्स केला. हा नजारा त्यावेळी पाहण्यासारखा होता. साखपुड्यावेळी ऐश्वर्या आपल्या पतीसोबत 'ओह मारिया' गाण्यावर थिरकली. आपल्या प्रत्येक विधीत त्यांनी मनसोक्त डान्स करून प्रत्येक क्षण एन्जॉय केला. दोघांनी 'दिल्ली वाली गर्लफ्रेंड' गाण्यावरसुध्दा डान्स केला.
ऐश्वर्या टीव्ही मालिका 'सास बिना ससुराल'मध्ये टोस्टी आणि 'मै ना भुलूंगी'मधील शिखाच्या पात्राने प्रसिध्द झालेली अभिनेत्री आहे. तिने 2011मध्ये 'यू आर माय जान' सिनेमात कामदेखील केले आहे. तसेच, तिचा पती रोहित नाग एक निर्माता आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ऐश्वर्या आणि रोहित यांच्या लग्नाचे इनसाइड फोटो...