Home »TV Guide» Wedding Album Of Diya Aur Baati Hum Fame Anas Rashid

38 वर्षांच्या या अॅक्टरने 24 वर्षीय तरुणीशी केले लग्न, पत्नी म्हणाली, 26 वर्षांचेच दिसतात

दिव्य मराठी वेब टीम | Sep 10, 2017, 13:07 PM IST

मुंबई - प्रसिद्ध टीव्ही शो 'दीया और बाती हम'मध्ये सूरजची भूमिका करुन प्रसिद्धी मिळवलेल्या 38 वर्षीय टीव्ही अॅक्टर अनस राशीद याने 24 वर्षीय हिनाबरोबर लग्न केले आहे. दोघांचा निहाक मालेरकोटला(पंजाब) मध्ये पारंपरिक पद्धतीने झाला. अनस लग्नात पांढरी शेरवानी परिधान करून आला होता, तर हिनाने पिंक कलरचा ग्रीन अँड ब्लू ब्रोकिट शरारा परिधान केला होता.

14 वर्षांच्या वयातील अंतराबाबत काय म्हणाली हिना..
- लग्नाच्या दरम्यान नुकतीच अनसने वयातील फरकाबाबत चर्चा केली.
- अनस म्हणाला, मी हिनाला माझ्या वयाबाबत विचारले होते, त्यावर ती तिला वय माहिती आहे असे म्हणाली होती.
- तिचे म्हणणे होते की, ती माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार आहे. उलट मी लग्नासाठी तयार आहे का असे हिनाने अनसला विचारले होते.
- हिनाच्या मते वयाने फार काही फरक पडत नाही. उलट तिची बहीण आणि ती म्हणाली की, मी तर 26 वर्षांचा दिसतो.

लवकरात लवकर करायचे होते लग्न
- अनसने सांगितले की, त्याच्या आईला मुलाने लवकर लग्न करावे असे वाटत होते. ती यासाठी अनेक दिवसांपासून वाट पाहत होती.
- नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याआधी लग्न करावे अशी माझीही इच्छा होती. आता मी रिलॅक्स आहे कारण मला लाईफ पार्टनर भेटली आहे.

कोण आहे हिना..
- हिना, अनसच्या गावाचीच आहे. पण तिचा अॅक्टींग क्षेत्राशी थेट संबंध नाही.
- हिना गेल्या ६ वर्षांपासून चंदिगडमध्ये राहते. तिने पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले आहे.
- हिनाला अनसच्या आईनेच त्याच्यासाठी निवडले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, इनस आणि हिना इकबालचा संपूर्ण Wedding Album...

Next Article

Recommended