आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडसोबत 7 वर्ष लिव्ह-इनमध्ये होती दिव्यांका, ब्रेकअपनंतर मुलाखतीत सांगितले होते दुःख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने 8 जुलै 2017 रोजी लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. दिव्यांकाने पती आणि अभिनेता विवेक दहियासोबत भोपाळयेथील कान्हा फन सिटी येथे लग्न केले. दोघांनी जवळपास एक वर्ष एकमेकांना डेट केले आणि नंतर लग्न केले. पण सर्वांनाच माहीत आहे की, दिव्यांका लग्नाअगोदर टीव्ही अभिनेता शरद मल्होत्राला डेट करत होती. 7 वर्ष लिव-इन मध्ये राहिली होती दिव्यांका..
 
 - दिव्यांका एक्स-बॉयफ्रेंड शरदसोबत जवळपास 7 वर्षे लिव्ह-इन मध्ये होती.
 - 'बनूं मैं तेरी दुल्हन'(2006) च्या सेटवर या दोघांचे अफेअर सुरु झाले होते. 
 - या मालिकेत दोघांनी पती-पत्नीची भूमिका केली होती. जवळपास एक वर्ष डेट केल्यानंतर यांनी लिव-इन मध्ये राहण्यास सुरुवात केली. 
 - दोघांना नेहमीच सोबत पाहिले जात असे. त्यानंतर 7 मार्च 2015 रोजी दोघांचे ब्रेकअप झाले. 
 - ब्रेकअपवेळी दिव्यांका ये हे मोहोब्बते मध्ये काम करत होती. या शोदरम्यान तिची विवेकसोबत ओळख झाली आणि एक वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले.

ब्रेकअपनंतर दिसले दिव्यांकाचे दुःख..
- ब्रेकअपनंतर दिव्यांकाने दिलेल्या एका मुलाखतीत रिलेशनशीपवर मोकळेपणाने चर्चा केली. दिव्यांका म्हणाली, "मी ब्रेकअपसाठी केवळ शरदला दोष देणार नाही. काही गोष्टी माझ्याही चुकल्या आहेत." 
- "मी व्यस्त असूनसुद्धा शरदच्या कुटुंबासाठी नेहमी वेळ काढत असे कारण मला माहीत होते की शरदचे कुटुंबावर फार प्रेम आहे." 
- "मी फार कमी वेळ झोपत असे कारण मला वाटावे मी शरदला जास्त वेळ द्यावा. मी जितके शरदसाठी केले तितके मी आजपर्यंत कोणासाठीच केले नाही."
- "स्त्रिया मुर्ख असतात आणि प्रेमात ते स्वतःचे अस्तित्वच विसरुन जातात. या रिलेशनशीपमध्ये मी हेच शिकले की काहीही झाले तरी स्वतःचे अस्तित्व जपा." 
 
ब्रेकअपबद्दल काय म्हटला शरद..
- ब्रेकअपनंतर शरद बोल्ला की, "जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा एका वेगळ्याच दुनियेत असतो पण जेव्हा आपण वेगळे होतो तेव्हा समोरच्या व्यक्तिबद्दल कधीच वाईट बोलू नये."
- "प्रेमात असल्यावर ते नक्की दाखवा पण नसल्यावरही समोरच्या व्यक्तिचा आदर करा."
-  "मी लोकांना दुखावणार नाही याचा फार प्रयत्न करतो पण मला हेसुद्धा माहीत आहे की मी अनेकवेळा लोकांचे मन दुखावले आहे."
- "ब्रेकअपनंतर मला सर्वच जण दोष देत होते. पण मला माहीत आहे की हे माझे जीवन आहे आणि ते कसे जगावे याबद्दल मला पूर्ण माहीती आहे."
- "मी दिव्यांकाला तिच्या लग्नाबद्दल खूप शुभेच्छा देतो. ती खूप चांगली मुलगी आहे आणि तिच्या आयुष्यात खूप खुश राहावी अशी मी इच्छा करतो." 
- दिव्यांका ब्रेकअपनंतर मॉडेल पूजा बिष्टला डेट करत आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, दिव्यांकाच्या प्री वेडींग फोटोशूटचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...