आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीत सेरेमनीपासून फेऱ्यांपर्यंत, दुसऱ्या लग्नात असा होता श्वेता तिवारीचा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 13 जुलैला टीव्ही अॅक्ट्रेस श्वेता तिवारी चौथी मॅरेज अॅनिव्हर्सरी साजरी करत आहे. 4 ऑक्टोबर 1980 ला प्रतापगड उत्तर प्रदेश) मध्ये जन्मलेल्या श्वेताने एक्स हसबंड राजा चौधरीला घटस्फोट दिल्यानंतर 2013 ला बॉयफ्रेंड अभिनव कोहलीबरोबर लग्न केले होते. श्वेता आणि राजा चौधरी यांची एक मुलगी आहे. तिचे नाव आहे पलक. ती आता श्वेताबरोबर राहते. श्वेता तिवारीच्या दुसऱ्या लग्नात संगीत सेरेमनीमध्ये पलकने भन्नाट डान्स केला होता, त्यामुळे तिची चांगलीच चर्चा झाली होती. अभिनव आणि श्वेता यांचा एक मुलगा आहे. त्याचा जन्म नोव्हेंबर 2016 मध्ये झाला होता. 

3 वर्षे डेट केल्यानंतर केले होते लग्न.. 
- श्वेता 2010 पासून अभिनव कोहलीला डेट करत होती. पण फार दिवसांनंतर त्यांनी ते जाहीर केले होते. 
- 2013 मध्ये डान्स रियालिटी शो 'झलक दिखला जा'च्या सेटवर श्वेताने ती जुलै महिन्यात अभिनवबरोबर लग्न करणार असल्याचे जाहीर केले होते. 
- 13 जुलै 2013 ला झालेले हे लग्न मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झाले होते. 
- श्वेताने राजा चौधरी याला लग्नानंतर 9 वर्षांनी म्हणजे 2007 मध्ये घटस्फोट दिला होता. 

या शोमध्ये झळकली.. 
- श्वेताने तिच्या टीव्ही करिअरची सुरुवात 2001 मध्ये 'कहीं किसी रोज' द्वारे केली होती. पण तिला प्रसिद्धी मिळाली ती 'कसोटी जिंदगी की' या शोद्वारे. 
- नंतर तिने 'जाने क्या बात हुई', 'यहा मै घर-घर खेली', 'अदालत', 'सजन रे झूठ मत बोलो', 'परवरिश : कुछ खट्टी कुछ मीठी', 'रंगोली', 'बाल वीर' अशा अनेक शोमध्ये काम केले. 
- तिची शेवटची मालिका 'बेगुसराय'(2015-16) होती. त्यात तिने बिंदिया नावाची खलनायिका साकारली होती. 

पुढील स्लाइड्सवर पाहा श्वेता आणि अभिनव यांच्या लग्नातील मेंदी, संगीत आणि लग्नासह रिसेप्शनचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...