आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wedding Photos: Archana Vijaya Dheeraj Puri\'s Beach Weddings

WEDDING PHOTOS: या टीव्ही अॅक्ट्रेसने बॉयफ्रेंडसोबत बीचवर थाटले लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- अर्चना विजया, धीरज पूरी)
मुंबई- आयपीएलची अँकर, व्हिजे आणि खतरो के खिलाडीच्या नवीन पर्वाची स्पर्धक अर्चना विजयाने दिल्लीचा रहिवासी उद्योगपती धीरज पूरीसोबत विवाह केला. त्यांनी थायलँडमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केली. थायलँडच्या सुंदर बीचवर दोघांनी लग्न थाटले. कुटुंबीय आणि मित्र परिवारच्या साक्षीने अर्चना आणि धीरजने शाही पध्दतीने आपला विवाह उरकला. हे सेलिब्रेशन 3 दिवस चालले. लग्नाच्या दिवशी अर्चनाने क्रिम आणि गोल्डन रंगाचा लहंगा परिधान केला होता.
अर्चना एक रिअॅलिटी शो जिंकल्यानंतर लाइमलाइटमध्ये आले होती. त्यानंतर ती आयपीएल सामन्यांदरम्यान अँकर शिवानी डांडेकरसोबत मिळून कमेन्ट्री करताना दिसली होती. अर्चना सध्या 'खतरो के खिलाडी' शोमध्ये काम करत आहे.
अर्चना आणि धीरज पहिल्यांदा एका फ्रेंडच्या लग्नात भेटले होते. काही दिवसांपूर्वी धीरजने तिला लग्नाची मागणी घातली आणि काही दिवसांपूर्वीच्या नात्याला त्यांनी लग्नात रुपांतरित केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अर्चना आणि धीरजच्या लग्नाची छायाचित्रे...